पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/427

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ १२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. पाडण्याचा लोक जितका प्रयत्न करतील तितका थोडाच समजला जाईल. कमिटीचे असें मत झालेले आहे कीं, अ आ इ ई इत्यादि वर्णमालेचा हल्लीं जो क्रम आहे, तो अक्षर लिहिणें व शिकविणें असल्यास गैरसोयीचा व कठीण आहे. अला आरंभी एक वांकडे वाटोळे काढून त्याचे पोट फोडून पुढे काना आणि वर ओळ काढावी एवढा खटाटोप लहान मुलास आरंभीच शिकविणें बरोबर नाहीं; त्यापेक्षां पहिल्यानें * ग’ हे उभ्या दोन रेघांचे सोपे अक्षर शिकविले असता मुलें ती लवकर शिकतील आणि अशा रीतीनें * ग ’ झाल्यावर * म' मग * भ' पुढे * र ? व त्यापुढे * ड ? शिकविला म्हणजे अखेरीस विद्याथ्याँस * ढ ' ची ओळख करून दण्याची चांगली सोय होईल ! ज्यांनीं आपल्या डोक्यांतून ही अजब युक्ति काढली तो विद्वान् गृहस्थ पुरा शास्त्रानभिज्ञ किंवा वैयाकरण-खसूचीच्या कोर्टातील असला पाहिजे. वर्णमालेची अक्षरें शिकतांना सौलभ्य हा एकच विचार मनात आणावयाचा नाही. आमच्या वर्णमालेची रचना अशी आहे कीं, सर्व व्हस्वदीर्घादि भदाने आधीं घालून नंतर कंठयादि वर्गाप्रमाणें व्यजनाची रचना केलेली आहे. ही रचना इतकी पायाशुद्ध आहे कीं, युरोपियन लोकानाही पंचवीशे वर्षापूर्वी अशी रचना आम्ही कशी केली याचे आश्चर्य वाटत आहे ! प्रो. मॅक्डोनेल यांच्या संस्कृत वाङ्मयावरील ग्रंथांत त्यांनीं यासंबंधाने खाली लिहिल्याप्रमाणे मत दिले आहे: - “ This is the alphabet which is recognised in Pānini's great Sanskrit grammar of about 4th century B. C and has remanied unmodified eversince It not only represents all the sounds of the Sanskrit Ilanguage, but is arranged on the thoroughly scientific method, the simple vowels (short and long) coming first, then the dipthongs, and lastly the consonants in uniform groups, according to the organs of speech with which they are pronounced. Thus the dental Consonants appear together; as t, th; d, dh, n, and the labials as p, ph, b, bh, m We Europeans, on the other hand, 2500 years later, and in a scientific age, still employ an alphabet which is not only inadiquate to represent all the sounds of our Languages, but even preserves the random order in which Vowels and Consonants are jumbled up as they were in the Greek Adaptation of the primitive Semitic Arrangements of 3000 years ago " आमच्या वर्ण मालेच्या रचनेचे श्रेष्ठत्त्व दाखविण्यास वरील उतारा बस्स आहे. आधीं ग मग म आधी र मग ड अशा बेताल रीतीने इंग्रजी वर्णमाळेत अक्षरें घातलेली आहेत. पण आमच्याकडे, पाणिनीच्या पूर्वीपासूनही ही गैरव्यवस्था मोडून टाकून क ख ग घ ड अशा रीतीनें सर्व व्यंजने स्थानवार व्यवस्थित रीतीने आम्हीं लाविलीं असून लहान मुलास पहिल्यापासून तीं याच क्रमानें