पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/433

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

98く लो० टिळकांचे केसरींतील लेख. इतर प्रांतांत तेथील भाषावृद्धीविषयीं जे प्रयत्न चालले आहेत तितकेही मराठी भाषेसंबंधानें महाराष्ट्रांत नाहींत ही मोठी दु:खाची गोष्ट आहे. जी मराठी भाषा एके काळीं महाराष्ट्रातच काय पण म्हैसूर, कर्नाटक, हैद्राबाद, गुजराथ, बडोदें, माळवा, मध्यप्रात वगैरे दूरच्या प्रातातूनही राजकीय भाषा म्हणून प्रचलित होती, ती आता त्या ठिकाणाहून हुसकून खुद्द महाराष्ट्रांतही परकी होऊं पहात आहे. ही गोष्ट महाराष्ट्र भाषेच्या पुत्रास अत्यंत लाजिरवाणी आहे. सरकारी बुक-कमिटी क्रमिक पुस्तकात फेरफार करूं लागतांच ** बुद्धि ” -हस्व असावी की दीर्घ असावी, * पाणी ? सानुसासिक कीं साधेच लिहावें, * विद्वान् ’ याचा पाय मोडावा की न मोडावा, वगैरे व्याकरण वाद करण्यास जी मंडळी एकदम पुढे सरसावली त्यानचि मराठीची खरी अभिवृद्धी करण्याकरितां आजपर्यंत काय प्रयत्न केले व पुढे काय करण्यास तयार आहेत याचाही खुलासा केल्यास बरे पडेल. बगाल्यात बंगाली बोलणारे निदान चार साडेचार कोटी लोक आहेत; तेथे शैकडो ग्रंथ निघत आहेत; बंकिमचंद्रासारखे कादंबरीकार, रविंद्रासारखे आधुनिक कवि, व हितवादीसारखी ३५॥४० हजारानी रवपणारीं वर्नमानपत्रे निपजत आहेत. गुजराथी ज्ञानप्रसारक मंडळी आणि गायकवाड-प्रभृति गुजरार्थेतील राजे लोक गुजराथी भाषेला आज कित्येक वर्षे उत्तेजन देत आहेत. उर्दूकरिता निदान हैद्राबादचे निजाम सरकार व अलिगड लखनौ येथील मुसलमान जारीनें खटपट करीत आहेत. हिंदी भाषेच्या अभिवृद्धयर्थ नागरी--प्रचारिणी-सभा नावाची संस्था बनारस येथे स्थापन होऊन भाषासेवेचे काम फार नेटाने व व्यवस्थेनें चालू आहे, आणि लवकरच सर्व हिंदुस्थानांत हिंदी भाषेचा फैलाव होईल अशी त्या सभेच्या पुरस्कत्यसि बळकट आशा आहे. परंतु आमच्या मराठी माषेला मात्र कोणी वाली नाही असें दिसतें. राजकीय पाठिंबा नाहीं व लोकही उदासीन आहेत. थोडीबहुत वर्तमानपत्रे आहेत, त्याजवरही बर्डवुड साहेब्रासारख्या आग्लो इडियन कामगारांचा कटाक्ष. सरकारी बुककमिटी आली ती श्रीपासून ज्ञपर्यंत वर्णमालेत उलटापालट व तमाम शब्दांची रूपातरे करूं म्हणत आहे ! ख्रिस्ती मिशनरी लीक आमच्या पोरांप्रमाणें भाषेलाही भ्रष्ट करूं पहात आहे; व सुशिक्षित मंडळींनी तर मातृभाषेस कधींच सोडचिठी दिली आहे ! तेव्हा बिचाच्या महाराष्ट्र भाषेनें जार्वे तरी कोठे ? काव्येतिहाससंग्रह वगैरे मासिक पुस्तकें आश्रयाभावामुळे बंद पडतात; ऐतिहासिक कागदपत्र लोकांचे घरांत लोळत पडले आहेत; व पेशव्यांच्या रेजनिशा सरकारी पेटींतून अजून बाहेर निघत नाहीत. दक्षिणा-प्राइज--कमिटी कामकरणाराच्या अभावामुळे मृतप्राय झाली आहे; व तिची मुलगी डेक्कन व्हरनाक्युलर ट्रा. सोसायटी ही आईच्या वळणावर जाऊं पहात आहे; आणि ठिकाठकाणच्या वक्तृत्वसभा वक्त्यांच्या व खटपट्यांच्या टंचाईमुळे बंद पडत चालल्या आहेत. मराठी भाषैतील ग्रंन्थाचा संपूर्ण संग्रह करण्याचा प्रयत्न मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणी झाला