पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/439

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?ス9 लो० टिळकांचे केसरीतील लेख. लोकांचे सुधारणेस नेहमीं. ႏိုင္ငံႏွ असें प्राचीन इतिहासावरून आढळून येतें. पृथ्वी आपल्या आंसाभेंॉवतीं `र्षिरते असें प्रतिपादन करणाच्या ग्यालिलियोचा खिस्ती भटांनी केलेला छळ सुप्रसिद्धच आहे. पण पचागशोधनासंबंधानें खिस्ती धर्मीतील पाद्यांनीं जो हटवाद माजविला होता त्याचे एक मासलेवाईक उदाहरण नुकतेच प्रसिद्ध झालेलें येथे देतों म्हणजे खिस्ती धर्मशास्त्री किंवा पाद्री यांजकडूनही पंचांगाचे शेोधनास कसे अडथळे आले याची वाचकास कल्पना येईल. खिस्ती धमांप्रमाणे ‘ईस्टर ? हा सण फार महत्त्वाचा आहे. हा सण वास्तविक संपातानंतर पहिली जी पौर्णिमा येते तिच्यापुढे पहिल्या रविवारी पडतो. म्हणजे तो केव्हां येतो हें समजण्यास वासतिक संपाताचे किंवा सूर्यगतीचे, आणि पौर्णिमेचे म्हणजे चंद्रातीचे सूक्ष्म ज्ञान अवश्य लागतें. संपात हा बिंदु आकाशात चल आहे. करिता तत्संबंधी सूर्यगतीचे ज्ञान तर फारच सूक्ष्म असावें लागतें. परंतु प्राचीनकालीं हीं मानें सूक्ष्म रीतीनें माहीत नव्हतीं. अशा वेळीं म्हणजे सुमारें इसवी सन तीनशेपंचवीस सालीं निशाय येथे भरलेल्या खिस्ती धर्माध्यक्षांच्या सभेर्ने त्या वेळीं प्रचलित असलेलें चाद्र व सौरमान घेऊन ईस्टरच्या सणाचे गणित अमुक प्रकारें करावें असे ठरविलें. पाद्भद्याच्या सभेचा हा निर्णय त्या वेळच्या ज्योतिषाचे ज्ञानाप्रमाणे बरोबर होता; पण पुढे असे आढळून आलें कीं, या पाद्रीसभेनें स्वीकारलेलें चाद्रमान आणि सौरमान ही दोन्हीही चुकीची आहेत. पाद्रीसभेनें स्वीकारलेल्या सौरमानात दरवर्षी सुमारे अकरा मिनिटांची चूक होती. त्यामुळे सुमारे एकशे अठ्ठावीस वर्षात एक दिवस या मानानें वसतसंपात पाब्द्याच्या सभेने ठरविलेल्या दिवसापूर्वी पडू लागला; आणि पोर्णिमा ही तीनशें दहा वर्षानों एक दिवस माग येऊं लागली. अर्थात् पाद्याच्या सभेनें ठरविल्याप्रमाणे गणिताप्रमाणें काढलेला ईस्टर आणि खरा ईस्टर यामध्ये अंतर पडू लागलै; आणि हळू हळू पाद्याच्या गणितावरून आलेली पौर्णिमा आणि खरोखरीची पौर्णिमा यामध्ये इसवी सन बाराशेंच्या सुमारास तीन दिवसाचे अंतर पडू लागले. म्हणजे गणिताप्रमाणें जी पौर्णिमा यावयाची त्या पूर्वीचे तीन दिवस आकाशांत वास्तविक पौर्णिमा होऊं लागली. अशा रीतीनें पैौर्णिमेत फेर पडल्यावर मग ईस्टरच्या सणात फेर पडणारच व पडला. तेव्हां लोक पाद्यास विचारूं लागले कीं, “ असें का व्हावें ? निशाय येथे पाद्यांच्या सर्भेत खिस्तीधर्मशास्त्राप्रमाणें जो निर्णय झाला तो का चुकावा ? ' खिस्ती भटास या प्रश्नाचे उत्तर देणे अवश्य होतें. निशाय येथील धर्मपरिषदेच्या निर्णयास दोष देण्याची कोणाही खिस्तीभटाची छाती होईना. तेव्हा एकाने अशी युक्ति काढली कीं, सूर्यचंद्राच्या गतीत ज हैं अंतर पडले आहे हे मनुष्यांच्या पापाभुळे पडले आहे; कांहीं वर्षे लोटलों म्हणजे चेद्रसूर्य शिवाय येथील धर्मसभेच्या आज्ञापत्राप्रमाणे चालू

  • ... so

लागतील ! पण ही कल्पना मास्टर कॉन्रॉड् यास पसंत पडली नाहीं. हे खिस्ति