पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/440

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचांगशोधन. ? R" धर्माध्यक्ष इसवी सन बाराशें साली लिहिलेल्या आँफँी ग्रंथांत असे म्हणतात कीं,गणितानें आलेल्या पौर्णिमेत आणि प्रत्यक्ष पौर्णिमेला तैर्निदिवसांची जी चूक पडते तीच बरोबर आहे ! कारण खिस्तीधर्माप्रमाणे जग निर्माण झाल्यानंतर चैौथ्या दिवशीं देवानें सूर्यचंद्र निर्माण केले; आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे सातव्या दिवशीं पहिला मनुष्य आडॉम हा निर्माण केला. गरीब बिचाया आडॉमास देवाचे हें कृत्य काय ठाऊक ? त्याने आपल्या पहिल्याच रात्रीं आकाशात पाहिले आणि तेव्हां त्यास जेो चंद्र दिसला त्यासच तो पूर्ण चद्र म्हणू लागला. परतु वास्तविक तो तृतीयेचा चंद्र होता, कारण देवानें चंद्र पूर्वीच तीन दिवस निर्माण केला होता. गणितानें आलेल्या पौर्णिमेंत आणि वास्तविक पौर्णिमेत तीन दिवसांचे अंतर पडतें तें याचमुळे हेोय; आणि आपल्या परमपूज्य मूळ पुरुषाने जी ही चूक केली ती चूक असली तरी त्याच्या वंशजानी तशीच पुढे चालविणे हे त्याचे पवित्र व धार्मिक कर्तव्य होय ! कॉन्रॉड् भटजीची ही कल्पना काही वेळ लोकास बरी वाटली; पण तिचा खोटेपणा पुढे लौकरच दिसून आला. आणि सर्व खिस्ती भटास नवीन वेधानें उपलब्ध झालेलीं सूर्यचद्राच्या गतीचीं माने स्वीकारावी लागली. सुमारे सात आठशें वपॉपूर्वी युरोपात खिस्ती भटानीं हा जो धुमाकूळ माजविला होता तो लक्षांत आणला म्हणजे धर्मशास्त्रयाकडून ज्योतिपाचे सुधारणेंत कसा अडथळा येतो याचे स्वरूप वाचकाच्या लक्षात येईल. आमच्याकडे याच सुमारास यवनाकडून ज्योतिष शिकल्याबद्दल भास्कराचार्यांस बहिष्कृत ठेविले होतें, अशी दंतकथा आहे. तथापि, कॉन्रॉड् भटजीवर आमच्यापैकी कोणीही ताण केल्याचे दिसून येत नाही. असो; आजचा लेख लाबल्यामुळे याचा बाकीचा भाग पुढील खेपेवर टाकणे भाग आहे.

  • पंचांगशोधन.
  • नंबर २.

पुराणामित्येव न साधु सर्वम् । न चापि काव्यं नवमित्यवद्यम् || -कालिदास. पंचांगशोधन म्हणजे काय, त्याची आवश्यकता कशी उत्पन्न होते, आणि त्यास वेळोवेळीं विरोध कोणाकडून येतो; याचे थेोडक्यात गेल्या अंकीं निदर्शन केले आहे. आजच्या अंकात मुंबईस भरलेल्या ज्योतिषाचे परिषदेत जो निर्णय

  1. (केसरी, ता. २४ माहें जानेवारी १९०५)

५३