पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/443

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

? Rく लो० टिळकांचे केसरींतील लेख. नाही!! ही गोष्ट लक्षात आणली म्हणजे या पंचांग सुधारण्याच्या कामांत परकीय लोकांनी न पडणेंच बरे असे कोणाही इंग्रजी मुत्सद्दयास वाटणें स्वाभाविक आहे. अर्थात् हे हिदु धर्मगुरूं, हिंदुराजेरजवाड्यांनी आणि सर्व प्रातातील प्रतिष्ठित पुढारी आणि विद्वान् गृहस्थानीच हातात घेतले पाहिजे होतें. मुंबईस स्थापन झालेल्या पंचागकमिटीचा प्रयत्न याच दिशेनें झालेला आहे. राजेरजवाड्याकडून साह्य मिळण्याकरिता या कमिटीने खटपट केली आहे व करीत आहे; व बडोदें, ग्वाल्हेर, कोल्हापूर, कुरुदवाड, जयपूर, काठेवाड, वगैरे ठिकाणच्या संस्थानिकांकडून मदत व साह्य कमिटीस मिळाले आहे. यानंतरचा उद्योग म्हटला म्हणजे हल्लीं प्रचलित असलेल्या कॅग्रेिसच्या किंवा कॉन्फरन्सच्या पद्धतीवर हिंदुस्थानातील ठिकठिकाणच्या प्रमुख ज्योतिषाची एक मोठी परिषद भरवून या विषयासंबंधानें एकमत्य करणे हा होय. मुंबईस गेल्या डिसेंबरांत ज्योतिषी लोकाची जी परिषद भरली ती याचकरिता होती,व तिचे काम चागल्या रीतीनें सिद्धीस गेलें ही समाधानकारक गोष्ट आहे. हें काम पुढे अशीच रीतीनें चालल्यास पंचागाची सुधारणा वर सागितलेल्या दोन्हीही प्रकारानें लौकरच घडून येईल अशी आम्हास उमेद आहे. आतां या परिपदेत जे ठराव झाले आहेत त्याच्याकडे वळू. परिषदेपुढे पहिला प्रश्न म्हटला म्हणजे सूर्यचंद्रादि ग्रहाच्या गतिमानासंबंधाचा होता. वर आम्ही सांगितलेच आहे कीं, ही गतिमानें उत्तरोत्तर आधिकाधिक सूक्ष्मतेनें उपलब्ध होत आली आहेत. असा कोणताही जुना सिद्धात नाहीं कीं ज्यातलें सौरवर्षमान हल्लींच्या सूक्ष्म वेधेोप लब्ध मानाशी तंतोतंत जुळतो. सूर्यसिद्धात ध्या,सिद्धात शिरोमणी ध्या, किंवा दुसरा कोणताही सिद्धात ध्या, त्यांतील सौरमान बीजसंस्काराखरीज सूक्ष्म पचागास घेता यावयाचे नाहीं. सर्व सिद्धांतात सूर्यसिद्धात प्राचीन आहे, आणि त्यातील सौरवर्षमानही हल्लीच्या सूक्ष्म वेधानें उपलब्ध झालेल्या मानाशीं अधिक जवळ आहे. तेव्हा बापुदवशास्त्री यानीं पंचागांत अशी योजना केलेली आहे कीं, सूर्यसिद्धातातील सौरमान घेऊन त्याप्रमाणें गणित करावयाचे; पण सूर्यसायन करिताना अयनगति मात्र दरसाल अठ्ठावन विकला घ्यावयाची. ही अयनगति वास्तविक अयनगतीपेक्षा सुमारे आठविकला जास्त असल्यामुळे सूर्यसिद्धातांतील सौरमानाची आठ पळांची चूक वजाबाकींत निघून जाते; आणि सायनसूर्य बरोबर येतो. पण ही अठ्ठावन विकलाची अयनगति इतर ठिकाणीं जास्त होते; करितां इतरत्र ती वेधाप्रमाणें बीजसंस्कृत घ्यावी, आणि सौरवर्षमानापुरती अट्टावन विकला ध्यावी असा पहिल्या दोन ठरवांचा अर्थ आहे. चेद्र आणि इतर ग्रहाच्या गतीचीं माने कोणत्याही सिद्धांतातलींच मार्ने घेतली तरी त्यांस वेधाप्रमाणे लागेल तो बीजसंस्कार द्यावा असा या परिषदेनें ठराव केला आहे. साराश, सूर्य, चंद्र इतर ग्रह किंवा अयनगति यांचीं मानें सांप्रतच्या सूक्ष्म वेधार्ने जेव्हा जव्हां जशीं जशीं उपलब्ध होतील तशीं तशीं तीं घेत जावीं, असें या परि • षर्देत स्पष्ट ठरलें आहे याबद्दल कोणाचाही मतभेद नाहीं.