पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/448

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४ ३३ संबंधार्ने या देशांतील आर्यधर्मी लोकांवर जें एक प्रकारचे साम्राज्य स्थापित केले आहे तें नसतें तर, इंग्रजी साम्राज्याचा वर जेो परिणाम सांगितला तो घडून आला असता कीं नाहीं, याची वानवाच आहे. रामायण आणि महाभारत याची ही योग्यता आज आम्ही नवीन सांगत असें नाहीं. व्यासांनीं, ब्रह्मदेवास आपल्या काव्याचे वर्णन देऊन * परं न लेखकः कश्चित् एतस्य भुवि विद्यते ? । अशी जेव्हां प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवानें या काव्याचा लेखक होण्यास गणपतीस पाचारण कर, असे सांगितले; व पुढे श्रीगजानन, माझी लेखणी न थांबे अशा रीतीनें भारत सांगितले असतां तें मी लिहीन अशी अट ठेवून लेखक झाले ! तेव्हांपासून आतांपर्यंत या ग्रंथाचे महत्त्व एकसारखेंच चालू आहे. अनेक संस्कृत कवींनी हे आधारभूत घेऊन त्यांतील रत्नास पैलू पाडून किंवा तीं निराळ्या कौदणांत बसवून स्वतः स्वतंत्र काव्यरचनेचे श्रेय संपादन केले आहे. त्याचप्रमाणे कित्येकांनीं आजवर टीका करून किंवा सामान्य जनांस समजेल अशा प्राकृत भाषेत त्याचे रूपांतर करून आपणास कृतार्थ करून घेतले आहे, आणि पुराणिकांनी आपणांस नव्हे तर हिंदुस्थानांतील आबालवृद्ध स्रीपुरुषास त्या महाग्रंथाच्या श्रवणानें पुनीत करण्याचा क्रम हा ग्रंथ निर्माण झाल्यापासून अव्याहत चालू ठेवला आहे. हिंदुस्थानांतील सुशिक्षित वर्गामध्ये या ग्रंथाच्या अध्ययनाची किंवा श्रवणाची परंपरा कमी होण्यास जर केव्हां सुरवात झाली असली तर ती इंग्रजी राज्यांत इंग्रजी शिक्षणार्ने व्हावयास लागली होती किंवा होण्याचा संभव होता; परंतु ही भीति बाळगण्यास आतां फारसें कारण राहिलें नाहीं. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. इंग्रजी शिकलेल्या लोकांपैकीं पुष्कळांस राष्ट्रीय महाकाव्याचे महत्त्व समजूं लागले आहे. देश विपन्न स्थितीत आला असता या ग्रंथाच्या अध्ययनार्ने किंवा श्रवणानें कोणच्या प्रकारचे स्फुरण अधिकारी पुरुषांच्या अंगांत उद्भवतें हें शिवाजीमहाराजांच्या उदाहरणावरून शाळेतील विद्याथ्याँसही माहीत झाले आहे. सारांश, हा राष्ट्रीय ग्रंथ आहे; आणि हा आधार सुटला असतां राष्ट्राच्या पुढील प्रगतीस जें एकप्रकारचे वैशिष्टय प्राप्त व्हावयास पाहिजे तें प्राप्त व्हावयाचे नाहीं, असा चांगल्या विद्वानांचा समज झाला आहे, महाभारताची इंग्रजीत किंवा मराठीसारख्या प्राकृत भाषेतही हल्लीं जीं भाषांतरें होत आहेत त्यांतील बीजही हेंच होय. भगवद्गीतेचे अध्ययनही इंग्रजी शिकलेल्या लोकांत अलीकडे जें अधिक होत चालले आहे तेंही वर सांगितलेल्या विचारसरणीचेच द्योतक होय. परंतु आजपर्यंत इंग्रजी शिकलेल्या विद्वानांपैकीं महाभारताचे नवीन पद्धतीनें परीक्षण करून थोडक्यांत त्यातील रहस्य काय, त्याचे महत्त्व कशांत आहे, तें कोणी व केव्हां लिहिले किंवा अशा प्रकारचे महाकाव्य लिहिण्यास काय कारण झालें, त्यांतील कथेमधील सरस भाग कोणते, ही कथा ऐतिहासिक आहे का काल्पनिक आहे, ऐतिहासिक असल्यास या ५४