पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/451

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. पूर्वक समग्र महाभारत वाचून त्याचे नवीन पद्धतीनें परीक्षण ज्यात केले आहे असा आमच्याकडील विद्वानानी लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ होय. त्यांतील कांहीं गोष्टीसंबंधार्ने आमचा व ग्रंथकाराचा मतभेद असला तरी अशा प्रकारचा ग्रंथ रावबहादूर वैद्य यानीं प्रसिद्ध केला याबद्दल सर्वोच्या वतीनें त्यांचे अभिनंदन करणें जरूर आहे, व तशा प्रकारचे अभिनंदन करण्याकरितांच आजचा लेख लिहिला आहे. महाभारताची ग्रंथरचना, काल किंवा काव्य या नात्यानें परीक्षण इत्यादि गोष्टसंबंधानें रावबहादूर वैद्य यांचे विचार काय आहेत याचे परीक्षण करणें ते पुढील दोन चार लेखांत करण्याचे योजिले आहे.

  • महाभारत

नंबर् २ महृत्त्वे च गुरुत्वे च प्रियमानं यतोऽधिकम् । महत्त्वाद्भारवत्वाच्च महाभारतमुच्यते ॥ १ ॥ -आदिपर्व अ. १-६७०-७९. रावबहादूर चितामणराव वैद्य यानी आपल्या पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागांत आर्ष महाकाव्य या दृष्टीनें महाभारताचे विवेचन केलें असून त्याची रचना कसकशी होत गेली, त्याला हल्लीचे स्वरूप कसे वृ केव्हा आले, वैष्णव धर्माची महती आंत कितपत गायलेली आहे, आणि आर्ष महाकाव्याचे पाश्चिमात्य लक्षण घेतलें तरी त्याप्रमाणेही महाकाव्याचे सर्वगुण महाभारतांत कसें आले आहेत याचे सहा पोटभागांत विवेचन केले आहे. पुस्तकाच्या उत्तराधांत महाभारताचे ऐतिहासिकरीत्या परीक्षण आहे व त्यांत पहिल्यानें महाभारतयुद्धाचा काल आणि पाडवांचे अस्तित्व आणि पूर्वज याचे विवेचन करून पुढे भारतांतील कथानक थोडक्यांत पण सरळ रीतीनें सागितले आहे. याखेरीज ग्रंथास सहा परिशिष्टैं जोडली आहेत. त्यांत पहिल्यानें महाभारतांतील पर्व, अध्याय व लोकसंख्या दिलेली असून पुढे पोटपर्वे व कूटश्लोक सांगून नंतर महाभारतांत पाठीमागून केोणचीं पवें घातली असावीत याची याद दिली आहे. सरतेशेवटच्या दोन परिशिष्टांत महाभारतातील दुहेरी गृहस्थिति व जनमेजयाची ब्रह्महत्त्या या दोन गोष्टींचा खुलासा देऊन ग्रंथ पुरा केला आहे. या सर्व प्रकरणावर वर्तमानपत्रांत सविस्तर टीका करणें अशक्य आहे. ज्यांस त्यासंबंधीं माहिती पाहिजे असेल त्यानी ती रा. ब. वैद्य यांच्या मूळ ग्रंथावरून मिळविली पाहिजे. आमच्या लेखांत यांपैकी कांहीं ठळक गोष्टींचा मात्र आम्ही विचार करणार आहीं.

  1. (केसरी, ता. ११ एप्रिल १९०५ ).