पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/454

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४३९ निरुक्ते त्यार्ने दिली नसती. अशा प्रकारचा निरुाक्तै शब्द पहिल्यानें रूढ झाल्याखेरीज उत्पन्न होत नाही. कसही असेो; व्यास,वैशंपायन आणि सौति या तिघांनी केलेलें, शोधलेले आणि वाढविलेले महाभारत हल्लीं आपणांस उपलब्ध आहे, असा जो रा. ब. वैद्य यानीं सिध्दान्त केला आहे त्यात आमच्यामतै कांही चूक नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे कीं, सौतीच्या पूर्वीच ह्या ग्रंथास महाभारत हे नाव प्राप्त झाले असून तें तेव्हाच जवळजवळ एक लक्षात्मक झालेले असावे. ग्रंथरचनेसबंधानें दुसरा प्रश्न असा निघतो की, एक लक्षात्मक भारत कोणतें, चेोवीस हजार भारत केोणते, कोणकोणचीं पर्वे किंवा प्रकरणें मागून आली आणि तीं केव्हा व कोणीं घातलीं ? हरिवश महाभारतात धरल्याखेरजि एक लक्ष भारत होत नाही असे वैद्य यानी आपल्या पुस्तकाच्या पहिल्या परिशिष्टात दाखविले आहे. आदिपर्वात दिलल्या अनुक्रमणिकेप्रमाणे अठरा पर्वे आणि हरिवंश मिळून ९६,८३६ लोक महाभारतात असले पाहिजेत; आणि हल्लीच्या मुंबईच्या भारत--हरिवशाच्या प्रतींत ९५,८२६ लोक सापडतात. म्हणजे हल्लीं उपलब्ध असलेल्या महाभारतात व इरिवशांत मिळून सीतांच्या यादीपेक्षा एक हजार दहा लोक कमी येतात. हा फरक ग्रंथाच्या कालमानाकडे लक्ष दिले असता फार मोठा आहे असें नाही. या लक्ष ग्रथाषैकी उपाख्याने काढून टाकिली तर चोवीस हृजार ग्रंथ होईल; पण तसा प्रयत्न करण्यास चागली साधन उपलब्ध नाहींत, रा. वैद्य यांनी * संक्षिप्त भारत ’ म्हणून जेो महाभारताचा सक्षेप संस्कृतात प्रसिद्ध केला आहे तो याच तत्त्वावर प्रसिद्ध केला आहे. यूरोपियन लोकास २४००० सग्रहो मोठा वाटतो; व वेबर यानी अशी कल्पना केली आहे की, ८८०० कूट लोक म्हणून जे सागितले आहेत ते कूट म्हणजे मूल लोक असावेत. पण वेबरची ही कल्पना चुकीची आहे असे जथ हे लोक आले आहेत तेथील मागीलपुढील संदर्भावरून, उघड होतें. कूट ठीक म्हणजे अर्थ न समजण्यासारखें कठीण लोक असा तेथे अर्थ आहे. कारण त्यापुढेच ' अहं वेद्मि शुकावेति संजयो वेति वा न वा ’ असा चरण आहे. महाभारतापासून भारत पृथक् करणे किती दुर्घट आहे याचा पुरावा हल्लींच्याच महाभारतात सापडतो. अदिपर्वोत पहिल्या अध्यायात सौति असें म्हणते कीं, (लोक ५२):-- मन्वादि भारतं केचित् आस्तीकादि तथापरे । तथो परिचरादन्ये विप्राः सम्यगधीयते ॥ म्हणजे सौतीच्या वेळीच महाभारतास मनूच्या आख्यानापासून आरंभ होतो असें कित्येक मानीत असत, कित्येक आस्तिक पवांपासून आरंभ होतो असें मानीत आणि कित्येक उपरिचराच्या कथेपासून आरंभ होतो असे मानीत. हें वर्णन सौतीच्या वेळीं प्रचलित असलेल्या तीन निरनिराळ्या भारतासही लागूं पडेल