पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/463

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

??と लो० टिळकांचे केसरींतील लेख. भीष्मास धाक दाखविण्याचा जेव्हां प्रयत्न केला, तेव्हा भीष्मांनीं परशरामास असा खडखडीत जबाब दिला अोद्दे कीं, ** न जातवान् तदा भीष्मः तृणेषु ज्वलितं त्वया । ” यावरून महाभारतांतील संभाषणाचे भागांत स्पष्टेोक्तीचा गुण अधिक व्यक्त होतो, व समयविशेषीं त्यांतील पात्रे आपल्याहून वयानें किंवा मानानें श्रेष्ठ अशा मनुष्यास खणखणीत जबाब देण्यास मार्गे पुढे पाहत नाहीत असें जें रा. वैद्य यांनीं म्हटले आहे, तें किती यथार्थ आहे हें वाचकाच्या लक्षात येईल. महाभारतातील द्रौपदी, कुती वगैरे स्त्रियाचे वर्तनही अशाच प्रकारे अत्यंत शुद्ध आणि उदात्त वर्णिलेले आहे. द्रौपदीनें युधिष्ठिरास अनेक वेळा सणसणीत उपदेश केला आहे, व किरातार्जुनीयाच्या तिसच्या सर्गात * जुहुधीह पावकं ? असें द्रौपदीच्या तोंडात कवीनें वाक्य घातलेले आहे. पाडवाच्या अगी काहीं अवगुण नव्हते असे नाही. त्यानीं द्यूत खेळावयास जावयाचे नव्हतें, किवा द्यूतात लावलेले पण द्रौपदी वस्रहरणाची वेळ येईपर्यंत पाळावयाचे नव्हते, असे कित्येकाचे त्याजवर आक्षेप आहत तसेच भीष्म-द्रोणानी द्रौपदीवस्रहरण चालले असता ‘अर्थस्य पुरुषेो दास:' असें म्हणून स्वस्थ बसणेही योग्य नव्हर्ते, असेंही काहींकाचे म्हणणे आहे. पण आमच्या मतें अशा प्रकारच्या कमीपणानें काव्यातील प्रधान पुरुषाच्या स्वभाववैचित्र्याची शोभा न जाता ती अधिक खुलते. सर्वाशी निर्दोष असा जर काव्याचा नायक कल्पिला तर तो देवच होतो; आणि त्याच्या चरित्रापासून लोकांमध्यें महाकाव्याच्या लक्षणात सागितलेलें जें * शीलचरित्रवधैन ? तें होत नाही. युधिष्ठिरादिक पात्रे कितीही तेजस्वी, अभिमानी, दृढनिश्चयी किंवा नीतिमान असली, तरी एकंदरीत ती आमच्यापैकींच आहेत अशी भावना वाचकांच्या मनात असल्याखेरीज महाकाव्यात वर्णिलेले त्याचे चरित्र वाचकास जितके मोहक, बोधप्रद, आनंदकारक आणि अनुकरणीय वाटावें तितके वाटत नाहीं. भीमाचा उद्दामपणा, अर्जुनाचे कौशल्य, युधिष्ठिराची धर्मभीरुता, स्रीस्वभावास अनुसरून द्रौपदीचे अगांत असलेली नीतिमत्ता, धैर्य आणि ऐहिक वैभव भेोगण्याची इच्छा, श्रीकृष्णाची कर्तबगारी, दुर्योधनाचा दुरभिमान किंवा कर्णाचे शौर्य आणि असूया ही जी आज दोन अडीच हजार वर्षे भरतवर्षातील आबालवृद्धांच्या तोंडीं बसून जाऊन त्यांच्या लोकयात्राक्रमास आधारभूत होऊन राहिलीं आहेत, त्यांतील बीज हेंच होय. पांडव धीरोदात व शूर असतील वा नसतील. बिल्हणानें म्हटल्याप्रमाणें त्याचे यश रामाप्रमाणें आज चेोहोंकडे विस्तृत होण्यास आणि दुर्योधनाचे रावणाप्रमाणे संकुचित होण्यास व्यासाचेच महाकाव्य कारणीभूत झाले आहे. कवीच्या अनुग्रहाखेरीज मोठमोठया राजाचीही आठवण कशी नष्ट होते, याचे कल्हणाने “स्मृतिमपि न ते याति क्ष्मापा विना यदनुग्रह । प्रकृतिमहते कुर्मस्तस्मै नम: कवि कर्मणे । ” असें जें वर्णन केले आहे तें अगदीं यथार्थ आहे. महाकाव्यातील प्रधान पात्रे ऐतिहासिक असावीत, अर्थात् तीं मोठया कुळांतील व वैभवशील असली तरी व्यवहारातील असावीं, असे जें आर्ष-महाकाव्याच्या