पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/467

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

생년, o लो० टिळकांचे केसरींतील लेख. नाहीं, तर सदर ब्राह्मणग्रंथ रचले गेले त्या काळीं अश्वमेध कती जनमेजय पारीक्षित माहृित हेीता, पण अश्वमेधकर्ता युधिष्ठिर माहीत नव्हता असे म्हणावे लागतें. कारण अश्वमेधकत्यी मोठमोठया राजांची नावे जर शतपथ ब्राह्मणात आहेत तर युधिष्ठिराचे नांव त्यांत अवश्य यावयास पाहिजे होतें. आतां काणी असे म्हणेल की, जनमेजयाचे नाव आहे तर युधिष्ठिराचे असले काय आणि नसलें काय सारखेच; पण यावर उत्तर असें आहे कीं, वैदिक ग्रंथ तोंडपाठ ठेवण्याचा प्रघात असल्यामुळे ते अधिक विश्वसनीय आहेत; व त्यांत युधिष्ठिराचे जर नांव नाही, तर जनमेजयाच्या पूर्वीचे पांडव कदाचित् केोणी तरी मागाहून कल्पिले असतील, आणि ते जनमेजयास जेोडून महाभारताची कथा लिहिली गेली असेल. पाश्चिमात्य पंडितांच्या मतें शतपथ ब्राह्मणादि ग्रंथ फार झाले तर खिस्ती शकापूर्वी दहाव्या किंवा बाराव्या शतकात लिहिले गेल असावेत. यांत युधिष्ठिराचे नाव नाही, आणि पाणिनीच्या सूत्रात ते नाव आढळते; तर वैदिक ब्राह्मण ग्रथ आणि पाणिनीची सूत्र याच्या दरम्यानच्या कालात कवीनीं काल्पनिक पाडव उत्पन्न केल असावे ! वैदिक ग्रंथात अमुक एक गोष्ट नाहीं म्हणून ती वैदिककालीं नव्हती, असे विधान करणें साहसाचे आहे. कारण या रीतीनें हजारों पशुपक्षी कीं ज्यांचीं नांवे वेदात नाहीत ते त्या काळीं नव्हतें असें म्हणावें लागेल. यावर पाश्चिमात्य पंडित असे उत्तर देतात कीं, ही कोटी खरी आहे; पण अश्वमेध कत्यांमध्यें जनमेजयाचे नाव शतपथ ब्राह्मणांत येतें, आणि त्याचा पूर्वज जो युधिष्ठिर त्याचे येत नाही, याची संगति या काटीनें लागत नाही. मुळी कोणाचीच नावें नसती तर गोष्ट निराळी. पण भारताप्रमाणें प्रसिद्ध असलेला अश्वमेधकर्ता सार्वभौम असा जो युधिष्ठिर तो वगळला जावा, आणि त्याच्या पणतूचा उल्लेख यावा, हे विसंगत दिसते; व पांडव हे कोणी तरी मागाहून कल्पिले असावे अशा प्रकारचे काहीं समाधान मानल्याखेरीज निवाह लागत नाहीं ! युरोपियन पंडितांच्या कोटीचे स्वरूप लक्षात येण्याकरितां ती आम्ही थोड्याशा विस्तारानें येथे सागितली आहे. रा. वैद्य यांस ही कोटी नीट उलगडली गेली नाही, असे त्याच्या लेखांवरून दिसते. त्याचे असे मत आहे कीं, इद्रोत दैवाप शैौनकाच्या अनुग्रहानें ब्रह्महत्येचा दोष अश्वमेधानें घालविणारा शतपथ ब्राह्मणांतील जनमेजय आणि सर्पसत्र करणारा जनमेजय प्राय: एकच असावा; कारण शतपथ ब्राह्मणात जनमेजयाचे उग्रसेन, श्रुतसेन आणि भीमसेन असे जे तीन बघु सागितले आहेत तेच सर्पसत्र करणाच्या जनमेजयाचे बंधू होते, असें आदिपर्वाच्या तिसच्या अध्यायाच्या आरंभीं सांगितले आहे. रा, वैद्य याचे म्हणणे असे दिसतें कीं, जनमेजय हें नांव एखाद्या वंशवृक्षांत दोनदा येऊं शकेल; पण चारी भावांचीं नांवें सारखीं असा प्रकार दोनदां होणे शक्य नाहीं एतएव शतपथ ब्राह्मणातील जनमेजय आणि सर्पसत्रकर्ता जनमेजय हे एकच होत. परंतु, शतपथ ब्राह्मणांत सागि