पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/469

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9년 3 लो० टिळकांचे केसरींतील लेख. पुराणाच्या ४ अंशांच्या २१ व्या अध्यायांत स्पष्ट लिहिले आहे. यावरून महाभारताच्या आदिपर्वाच्या तिसच्या अध्यायांत सर्पसत्रकत्र्या जनमेजयाचे जे बंधु सांगितले ते चुकीनें सांगितलेले नाहीत असें उघड होतें आजाचे नांव नातवास देण्याची जुनी परंपरा लक्षात आणली म्हणजे आजाच्या दोन बंधूच्या नावाची नातवांच्या दोन बंधूच्या नावांत द्विरुक्ति होण्यास काहीं हरकत नाहीं. आतां प्रश्न एवढाच राहिला कीं, जनमेजय दोन होते, व पहिल्या जनमेजयाची ब्रह्महत्या अमुक प्रकारची होती, असा कोठे स्पष्ट उल्लेख आहे कीं, नाहीं ? रा. रा. त्रिंबक गुरुनाथ काळे यांनी आम्हांस दाखविलेल्या त्याच्या हस्तलिावित * महाभारत विचिकित्स 'त याचा खुलासा केला आहे. हरिवंशांत पहिल्या पर्वीच्या ३२ व्या अध्यायात जनमेजयाचे पूर्वज त्यास सांगतांना (लोक १०४-१०५ ):द्वावृक्षौ तव वंशेऽस्मिन् द्वावेव परिाक्षतैौ । भीमसनास्त्र यीराजन् ! द्वावेव जनमेजयौ । असा स्पष्ट उल्लेख आहे. इतर्केच नव्हे तर दोनही जनमेजय परीक्षिताचे पुत्र म्हणजे * पारीक्षित ’ होते असे म्हटले आहे. तेव्हा एक गोष्ट सिद्ध झाली कीं, पारीक्षित जनमेजय दोन होते; एक युधिष्ठिराच्या पूर्वजापैकीं व दुसरा त्याचा पणतु. आतां जेो सदेह राहिला तो फक्त ब्रह्महत्येबद्दल होय. त्याचाही खुलासा हरीवंशांत (पर्व १ अध्या० ३०, छो-६०-१६) यांत केलला आहे. ययातीला इंद्रानें संतुष्ट होऊन एक दैदीप्यमान रथ दिला होता. हा रथ युधिष्ठिराच्या पूर्वजांपैकी पारीक्षित जनमेजयाचे वेळीं गाग्र्य ऋषीच्या शापानें नाहींसा झाला. तेव्हां या जनमेजयानें पुष्कळ बोलणाच्या गाग्र्याच्या मुलाचा वध केला; व त्यामुळे या जनमेजयाकडून ब्रह्महत्या घडली. मग तो जनमेजय * लोहगंधी ' (रक्ताच्या वासाचा, महाभारताच्या शांतिपर्वात [ अ. १५० ] ही * रुधिरस्येव ते गधः ? असें पद आहे) होऊन सर्वोनी बहिष्कृत केल्यामुळे इकड तिकडे हिंडू लागला. पुढे तो इंद्रोत शैौनकास शरण गेला; आणि शैौनकानें अश्वमेध करून जनमेजयाचे ब्रह्महत्येचे पाप घालविले. पुढे हा रथ उपरिचर वसूच्या वेळीं इद्रानें संतुष्ट होऊन त्यास परत दिला; व जरासंधाला मारून तोच रथ भीमसेनानें वासुदेवास अर्पण केला. या कथेवरून इंद्रोत शौनकानें ब्रह्महत्येचे पाप घालविण्यासाठीं ज्या पारीक्षित जनमेजयाकरितां अश्वमेध केला ती पारीक्षित जनमेजय व ती ब्रह्महत्या, सर्पसत्रकत्र्या पारीक्षित जनमेजयाहून आणि त्यार्ने आपल्या अश्वमेधात तो यज्ञ समाप्त होत आला असतां ब्राह्मणास दिलेल्या शिक्षेहून भिन्न होती असें उघड होतें. शतपथ ब्राह्मणांत ज्या पारीक्षित जनमजयाच्या अश्वमेधाचा उल्लेख आहे, तो जनमेजय युधिष्ठिराचा पूर्वज मानला म्हणजे त्यांतील अश्वमेधकत्यति युधिष्ठिराचे नांव कां नाहीं, याची सयुक्तिक उपपात लागते. आणि त्यावरून उलट असा सिद्धांत काढतां येतो कीं, पाडव आणि भारतीय युद्ध शतपथ, ऐतरेय इ. ब्राह्मण ग्रंथाच्या कालानंतर झाले असले पाहिजेत. निदान एवढे तरी