पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/471

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

g년 상 लो० टिळकांचे केसरीतील लेख. घोंटाळा झाला आहे, हे गेल्या अंकीं दाखविलेंच आहे. अशा प्रकारच्या आणखी दोन तीन चुका रा. वैद्य यानीं केल्या आहेत. या चुका नीट लक्षात आल्याखेरीज भारतीय युद्धाचा रा. वैद्यांनी जो काल ठरविला आहे तो बरोबर आहे किंवा नाहीं हें नीट समजावयाचे नाहीं. करितां युद्धाचा कालनिर्णय सागण्यापूर्वी त्या चुका आज येथे देतीं. जनमेजयाप्रमाणेच काश्मीरच्या गोनर्द राजाबद्दलही रा. वैद्य यांनी केलेले विधान चुकीचे आहे. गोनर्दाचे नांव महाभारतात सागितलें नाहीं ही गोष्ट खरी आहे, पण हरिवंशांत असें स्पष्ट सागितले आहे कीं, जरासंधाने मथुरवर स्वारी केली, तेव्हां त्याच्यातर्फे काश्मीरचा गोनर्द राजा लढण्यास आला होता. (हरिवश विष्णु पर्व अ० ३८ श्लोक २०-२२). तेव्हा राजतरगिणीमध्ये गोनर्द पांडवाचा समकालीन होता, असा जो उल्लेख आहे तो रा. वैद्य म्हणतात त्याप्रमाणे निराधार आहे, असे मानतां येत नाही. हरीवंशांत गोनर्दाचा जो उल्लेख आहे तो आणि राजतरंगिणीत गोनर्दपासून जे पुढे राजे सागितले आहेत त्याच्या कालाचा आणि भारतीय युद्धाच्या कालाचा मेळ कसा घालावयाचा याचा विचार पुढे करण्यात येईल. काश्मीरच्या गोनदांचे नाव महाभारतात नसले तरी हरिबंशांत आहे एवढच सध्यां सागावयाचे आहे. परंतु रा. वैद्य यांची याहीपेक्षा मोठी चूक म्हटली म्हणजे मेग्यास्थिनीस यांच्या ग्रंथातील उतायावरून त्यानीं जें अनुमान काढिले आहे ती होय. किंबहुना भारतीय युद्धाचा काल खिस्ती सनापूर्वी सुमारे ३००० वर्षपर्यंतचा आहे असें दाखविण्यास रा. वैद्य यानी नवीन म्हणून जे प्रमाण पुढ आणिले आहे तें मेग्यास्थनीसच्या ग्रथातीलच होय. मेग्यास्थिनीस हा अलेक्झाडरनंतर काहीं कालानें पाटलीपुत्र (पाटणा ) येथे चंद्रगुप्ताच्या दरबारात सेल्यूकसच्यातर्फे ग्रीक वकील या नात्यानें रहात होता. त्या वेळी त्यानें हिंदुलोकाचा प्राचीन इतिहास व तत्कालीन स्थिति यांची बरीच माहिती गोळा करून ग्रीक भाषेत एक पुस्तक लिहिलें होतें, मेग्यास्थिनसिच हा ग्रंथ साप्रत उपलब्ध नाही पण त्याच्या ग्रंथांतून इतर ग्रीक व ल्याटीन ग्रंथकारानीं घेतलेले उतारे बरेच सापडतात, आणि एकत्र केलेल्या सर्व उतायाचे इंग्रजी भाषातर मि. मॅकक्रिंडल यानीं प्रसिद्ध केलेले आहे. मेग्यास्थिनीस यास जी माहिती मिळाली ती अर्थातच चद्रगुप्ताच्या दरबारी असलेल्या विद्वान् गृहस्थाकडून किंवा शास्त्र्याकडून मिळालेली असावी. परंतु मेग्यास्थिनीस यानेंही माहिती देताना ग्रीस देशातील पौराणिक पुरुष आणि हिंदुस्थान देशांतील पौराणिक पुरुष याच्या नावाचा बराच घोटाळा करून ग्रीक देशातले आणि हिंदुस्थानांतले पौराणिक पुरुष एकच असावें असे दाखविण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्यानें केलेलीं विधानें बरीच भ्रामक झालेली आहेत असो; मेग्यास्थिनीस याचे असे म्हणणे आहे कीं, हिंदुलोक डायोनिसॉसंपासून चंद्रागुप्तापर्यंत १५३ राजाच्या पिढ्या झाल्या व दरम्यान