पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/482

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. છે પિતા, ती कोणती आणि त्यापासून काय अनुमान निघर्ते आहे हें पहावयाचे राहिलें आहे. यासंबंधानें आम्हीं जेो विचार करणार तो हल्लीं उपलब्ध असलेल्या साधनावरूनच करणार आहॉ. यापेक्षां जास्त साधनें पुढे मार्गे उपलब्ध झाल्यास हें अनुमान कायम होईल किंवा फिरवावें लागेल हें निराळे सागितले पाहिजे असे नाही. कालगणनेची किंवा कालाचा निश्चय करण्याची हल्लींची पद्धत प्रचलित आहे ती अगदीं शास्रीय आहे त्यांत चूक नाहीं. परंतु साधनाच्या कमतरतेमुळे अनुमानांत थोडीशी संदिग्धता राहण्याचा संभव आहे व ती कालातरानेंच दूर होणारी आहे. वरील दोन मार्ग सोडून दिले म्हणजे पांडवाचा कालनिर्णय करण्यास उपयोगी अशा तीन चार गोष्टीच शिल्लक राहतात. पैकीं पहिली गोष्ट म्हटली म्हणजे विष्णुपुराण, भागवत वगैरे दोन चार पुराणात सापडणारा खाली लिहिलेला लोक होयः यावत्परिक्षतो जन्म यावन्नेदााभषेचनम् । एतद्वर्षसहृस्रं तु ज्ञेयं पंचदशोत्तरम् । म्हणजे परिक्षिताच्या जन्मापासून नंदास आभिषेक होईपर्यंत एक हजार पंधरा वर्षे गेलीं. कांहीं पुराणांत * ज्ञेयं ’ या ऐवजीं * शतं ’ असा पाठ आहे. या पाठाप्रमाणें आणखी शंभर वर्षे जास्ती म्हणजे १ १ १५ वर्षे होतात. कोणी * पंचदश ? याचा अर्थ पन्नास करतात; व कोणी व्याकरणाकडे दुर्लक्ष करून * शतंपच ’ असा पदच्छेद करून त्याचा अर्थ ५०० वर्षे असा धरतात. पण हे अर्थ चुकीचे आहेत. कारण वरील लोकात सांगितलेली वर्षांची संख्या विष्णुपुराणातच दुस-या त-हेने सांगितली आहे; व या दोन्हींचा जेणेकरून मेळ बसेल तीच संख्या खरी समजली पाहिजे. सप्तर्षीना काल्पनिक गती मानण्याचा एकदा प्रचार होता असे मार्गे आम्हीं सागितलेंच आहे. या रीतीप्रमाणे सप्तर्षि ते तु पारीक्षिते काले मघास्वासन् द्विजेोत्तम । प्रयास्यंति यदा चैते पूर्वाषाढां महर्षयः । तदा नंदात्प्रभृत्येष कलिर्वृद्धिं गमिष्यति । हे परिक्षिताचे वेळीं मघा नक्षत्रांत व नंदाचे वेळीं पूर्वाषाढा नक्षत्रांत होते असे वर्णन आहे. मघा धरून पूर्वाषाढापर्यंत दहा नक्षत्रे येतात; आणि दर नक्षत्रास शंभर वर्षे या मानानें परिक्षितापासून नंदापर्यंत एक हजार वर्षे धरीत असत असें सहज निष्पन्न होतें. परिक्षित आपल्या वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी गादीवर बसला. ही पंधरा सोळा वर्षे वरील हजार वर्षात मिळविलीं म्हणजे परिक्षित राजाच्या जन्मापासून नंदापर्यंत एकहजार पंधरा वर्षे येतात व * यावत्पारीक्षिते जन्म ? या वर दिलेल्या लोकाचाही तोच अर्थ आहे, अर्थात् त्या लोकाचा हाच अर्थ बरोबर आहे असें म्हणावें लागतें. पुराणांत परिक्षितापासून नंदापर्यंत हा जो काल दिलेला आहे तो कांह