पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/483

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ ६६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. तरी पूर्वीच्या आधारावरून दिलेला असेल, असें सत्कृद्दर्शनीं मानणें जरूर आहे. त्यांतून एकच पुराणांत हा काल असतां तर गोष्ट निराळी; पण तो दोन चार पुराणांत ज्या अर्थी सापडतो त्या अर्थी त्यास ऐतिहासिक परंपरेचा कांहीं आघार असावा, असें मानावे लागतें. रा. ब. वैद्य यांनी आपल्या पुस्तकात हा काल दिलेला आहे. परंतु तो विश्वसनीय न मानण्यास त्यानीं एक कारण दिले आहे. ते म्हणतात कीं, विष्णुपुराणातच पाडवाच्या समकालीन जरासंधापासून चोवीस मागध राजे सागून ते १००० वर्षे राज्य करतील, असें सागितले आहे. त्यानंतर पाच प्रद्येति राजे १३८ वर्षे राज्य करतील व पुढे दहा शैशुनाग वंशांतील राजे ३६२ वर्षे राज्य करतील असें म्हटले आहे; व शैशुनाग राजानंतर नंद राजे गादीवर येतील असा क्रम दिला आहे. या क्रमावरून पाडवाच्या समकालीन जरासंधापासून ३९ किंवा ४० राजे होऊन तितक्या मुदतींत १००० + १३८ + ३६२ = १५०० वर्षे काल गेला असे दिसून येते. परिक्षिताच्या जन्मापासून नंदराजापर्यंत १०-१५ वर्षे गेलीं असें * यावत्पारिक्षितो जन्म ? या लोकात सांगितले आहे; आणि मागध देशच्या राजांच्या गणनेवरून हाच काल १५०० वर्षांचा निघतो. अर्थात् हा विरोध अपरिहार्य असल्यामुळे या दोघांपैकी कोणताही काल ग्राह्य नाहीं असें रा. ब. वैद्य याचे म्हणणें आहे. आम्हास हें अनुमान बरोबर वाटत नाही. याचे पहिलें कारण असें कीं, १० १५ आणि १५०० या दोन्ही संख्या जरी सोडून दिल्या तरी मगध देशांत जरासंधापासून नंदापर्यंत ३९ राजे झाले हें विधान शिल्लक राहते तें राहतेंच.दरएक पिढीस वीस वर्षे हें रा. ब. वैद्य याचे प्रमाण घेतले तर ३९ पिढयास सुमारें ७८० किंवा ८०० वर्षे लागतात. या हिशेबानें नंदापूर्वी जरासंध सुमारें ८०० वर्षे होता असें अनुमान निघतें; आणि नदापूर्वी १० १५ वर्षे परिक्षिताचा जन्म झाला असे कंठरवानें म्ह्टलें आहे तर सामान्यतः १००० वपीचाच काल ग्राह्य आहे असेंच म्हणावे लागतें. दुसरे कारण असे कीं, मगध देशाच्या राजांचा काल १५०० वर्षाचा होता,असे सागण्यात यदाकदाचित् जरी चूक झाली असे मानले तरी परिक्षिताच्या जन्मापासून नंदापर्यंतच्या कालात तशी चूक झाली असेल असे मानता येत नाहीं. कारण तो काल मार्गे सागितल्याप्रमाणें दुहेरी रीतीनें म्हणजे सप्तर्षिकाच्या कालगणनेनें आणि सामान्य संख्येर्ने सांगितला आहे. तिसरे कारण काश्मीरच्या इतिहासांत काश्मीरच्या राजांच्या दिलेल्या पिढया होय. पांडवांचे वेळीं काश्मीरचा राजा गोनर्द असून भारतीय युद्धापूर्वी थोड्या वर्षे जरासंधानें मथुरेस वेढा घातला असतां तो बलरामाकडून मारला गेला, असें हरिवंशावरून सिद्ध होतें. या गोनर्दापासून शककत्र्या कनिष्क राजापुढला दुसरा काश्मीरचा राजा जो अभिमन्यु त्या पर्यंत ५२ पिढया झाल्या, अशी कल्हणकृत काश्मीरच्या इतिहासांत पूर्वपरंपरेनें माहिती दिली आहे. ही पिढयांची संख्या परिक्षितापासून नंदापर्यंत मगधदेशात झालेल्या राजांच्या पिढयाच्या संख्येशी बरोबर मिळते. कारण नंदापासून