पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/493

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४७६ लो० टिळकांचे केसरींतील लेख. पुत्र व एक कन्या अशीं तीन अपत्यें होतीं. पुत्रांपैकीं वडील राज्यवर्धन व धाकटा श्रीहर्ष, आणि कन्येचे नांव राज्यश्री. प्रभाकरवर्धन मरण पावल्यानंतर कोणीं गादीवर बसावें याची वाटाघाट चालली असतांच मालव देशच्या राजार्ने राज्यश्रीचा पति कनीजचा राजा यास मारून राज्यश्रीस कनोज येथे बंदींत ठेवल्याची बातमी येऊन पोहोचली. राज्यवर्धन हूणावर स्वारी करून तेव्हां परत आला होता. ही बातमी ऐकतांच त्यास त्वेष येऊन तो हर्षास मार्गे ठेवून आपणच आपला मामेभाऊ भंडी (यासच शिलालेखांत व हूएनछेगाच्या ग्रंथांत भान म्हटले आहे.) यास बरोबर घेऊन मालव देशच्या राजास शासन करण्यास निघाला. परंतु मालव राजास जिंकून परत येत असतां गौडराजा शशांक यानें मुलगी देतों या निमित्याने त्याला फसवून आपले घरीं आणून कपटार्ने त्याचा वध केला. ही बातमी हर्षास समजतांच तो * गौड राजाचा लवकरच वध करीन, नाहीं तर अग्निकार्षे भक्षण करीन ’ अशी प्रतिज्ञा करून दिग्विजयार्थ निघाला परंतु पुढे राज्यश्री बंदीतून निघून अरण्यांत गेली ही बातमी त्यास कळल्यावर भंडीस गौड राज्याच्या शासनार्थ जाण्यास सागून आपण राज्यश्रीच्या शोधार्थ विंध्यावटींत गेला, व तेथे ती त्यास दिवाकर मित्र नामक भिक्षूच्या आश्रमाजवळ मिळाली. राज्यश्रीच्या मनांनें तेव्हाच बौद्धधर्माची दीक्षा घ्यावयाची होती; पण गौडवधाची प्रतिज्ञा समाप्त करून आम्ही दोघेही एकदम दीक्षा घेऊं असें हर्षानें दिवाकरमित्नास सांगितल्यावरून दोघेही गंगेच्या कांठीं श्रीहर्षाचा तळ पडला होता तेथे आलीं. येणेंप्रमाणे हर्षचरित्रांतील कथानक आहे; आणि बाणकवीच्या शिरस्त्याप्रमाणें छेषादि अनेक अलंकारानी या ग्रंथाची पदरचना सुशोभित केलेली आहे. प्रभाकरवर्धन, राज्यवर्धन, राज्यश्री, हर्ष सर्व पात्रे व त्याची हकीकत ऐतिहासिक आहे. पण मौज अशी कीं, सबंध हर्षचरित वाचलें तरी श्रीहर्ष केव्हां झाला, त्याचे साम्राज्य कीठपासून केोठपर्यंत होते, त्याने कोणकोणते राजे जिंकले, त्याच्या सैन्याचा बंदोबस्त कसा होता, त्याच्या दिग्विजयास किती वर्षे लागली, दिग्विजय केल्यानंतर त्यानें राज्याचा बंदोबस्त कसा ठेविला अथवा आपल्या संपत्तीचा उपयोग कसा केला, याबद्दल प्रत्यक्ष अशी हर्षचरितात काहीं एक माहिती मिळत नाही. कोठे कोठे राजास जीं विशषणे दिलीं आहेत त्यातील छेषांवरून हो माहिती उपलब्ध होते. उदाहरणार्थ, श्रीहर्ष राजा दर पांच वर्षांनी आपलें सर्व द्रव्य प्रयाग येथे मांडलिक राजासमक्ष, ब्राह्मण, बौद्ध आणि गोरगरीब यांस वाटून देत असे असा जो हुएनछग याने उल्लेख केला आहे, त्यावरून “सकल भुवनकोशश्वाग्यजन्मनां विभक्तः ” असें जे श्रीहर्षराजाचे हर्षचरितांत आरंभीं वर्णन केलें तें अगदीं यथार्थ आहे; व टीकाकारानें “ अग्यजन्मानो, द्विजाः आदिनृपाः श्रवणाश्च ’ असा जो अर्थ केला आहे तोही बरोबर आहे असे दिसून येतें. तसेच * शेषभेगिमंडलोस्योपरि क्षमाकृतः ’ या वाक्यानेंही कांहीं राजे जिंकून