पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/498

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देह आणि आत्मा. 9くR परंतु सर्व शरीरावर अम्मल चालविणारें असें कांहीं तत्त्व शरीरांतून नष्ट झालेलें नसून सर्व अवयव व इंद्रियें विश्रातिसुखात मग्न असता हें तत्त्व जागरूक असतें. तिसरें प्रमाण * महानिद्रा ? म्हणजे मृत्यु हें होय. जड शरीरातून सर्व अवयवाना व इद्रियांना चलनवलन देणारा कोणी तरी शरीर सोडून जातो, त्यास मृत्यु असे आपण म्हणती. याशिवाय समुद्राच्या पृष्ठभागावर होणाच्या जलतरंगाचा दृष्टात देऊन व दुस-या कित्येक प्रमाणानी आपल्या प्राचीन तत्त्ववेत्त्या ऋषींनीं आत्म्याचे भिन्नत्व- प्रस्थापित केले आहे. पण नवीन पद्धतीनें शिकलेल्या आपल्या विद्वानांस हीं प्रमाणें व या कोट्या सर्वथा मान्य होण्यासारख्या नाहीत. जडचैतन्याच्या भिन्नरूपत्वासंबंधाचा वाद इकडेच आहे, असे नाहीं. तो युरोपांत देखील चालू होता. खिस्ती धर्माचे आधारभूत पुस्तक जें बायबल त्यांत आत्म्याचे अस्तित्व मानलेले आहे. परंतु अर्वाचीन काळीं युरोपात आधिभौतिक तत्त्वाच्या प्राबल्याची जी क्राति घडून आली, तिच्या योगाने हे बायबल - प्रणीत आत्म्याचे अस्तित्व झूट होय, असे शास्त्रज्ञास वाटू लागलें. खिस्तीधर्मग्रंथातून एक तर आमच्या उपनिषद ग्रंथाप्रमाणें अध्यात्मविचार सूक्ष्मपणें कोठेच केलेला नाहीं, शिवाय अलीकडील शास्राचे सर्व सिध्दांत प्रयोगसिद्ध असतात. आत्मा धरून आणून त्यावर प्रयोग करिता येईनात म्हणून रसायनशास्त्रज्ञ, पदार्थविज्ञानवेते वगैरे प्रयोगासद्ध (experimental ) शास्त्र खरें मानणारे लेोक केवळ जडवादी बनले. सुष्टीतील काहीं द्रव्थे शरीरांत एकीकरण पावली असता त्यास चेतना प्राप्त होते; पण ही चतना त्या घटकावयापासून भिन्न नव्हे; त्यांच्या एकीकरणाचा परिणाम होय; साराश, आत्मा म्हणून कांहीं शक्ति जडसृष्टीच्या पलीकडे असेल असें या शास्त्रज्ञास वाटेना. फार काय सांगावें, युरोपांत गाजलेला जो हर्बर्ट स्पेन्सर तोही पक्का जडवादी होता. ‘आत्मा' भिन्नरूपाने अविनाशी आहे, ही गोष्ट त्यास मान्य नव्हती. चेतना ही जडपदार्थांच्या एकीभवनाचा परिणाम असेच त्याचे मत हेोर्त. अखेरीस अखेरीस या मतात थेोडी चलबिंचल होऊन त्याच्या सत्यत्वाविषयी स्पेन्सरसाहेब साशंक झाले होते असे दिसतें. शास्रवेत्त्याच्या ह्या नवीन सिद्धाताचा परिणाम धर्मखात्यावर मात्र विशेष झाला. खिस्तीधर्म हा * आत्म्याचा मोक्ष ’ ह्या तत्त्वावरच उभारलेला आहे, खिस्ती धर्माची मोक्षाची कल्पना ‘सलेकिता' ही आहे. परमेश्वरातच आत्मा मिळून जावा, इतकी उच्च कल्पना त्याच्यात नाही. तथापि जेथे आत्म्याला अस्तित्वच नाहीसे झालें, तेथे त्याला भोक्ष कसचा ? जेो मुळी नाहींच त्याला मुक्ति काय देणार ? आत्म्याचे जडसृष्टीहून भिन्न असें अस्तित्व शास्त्रज्ञास संमत नसल्याकारणानें ते धर्म म्हणजे केवळ एक थोताड आहे असें मानू लागले. मात्र * आत्मा ? नाहीं, असें मानल्यामुळे दुसरी एक अडचण उत्पन्न झाली. ती ही कीं, धर्माची अशी वासलात लागल्यानतर धर्माच्या बंधनाने एकत्र बाधलेला समाज हा केोणास कोणी विचारीनासा होऊन, विस्कळित होईल. नीतीचे बंधन