पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/500

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदान्त आणि उद्योगाची दिशा. છે ૮ રે हल्लीं X-ray नांवाच्या किरणांचा शोध लागून लोलकांतून पलीकडे जात नाहीत असेही काहीं किरण असल्याचे शास्ररीत्या ठरले आहे. हल्लीं N-ray नांवाचेही नवीन किरण सांपडले आहेत. ह्या प्रकाशशास्त्रातील शोधाप्रमाणेच वर सांगितलेला अध्यात्मविद्येतील शेोध होय. जड शरीर म्हणजेच आत्मा हें तत्त्व खोटे ठरून, आत्म्याचे स्वतंत्र स्वरूप आणि मार्गे व पुढे असणारें आस्तित्व शास्रीय पद्धतीनें ठरविण्यात आले आहे. हा सिद्धात बारीकसारीक क्षुद्र लोकाचा नसून तत्त्ववेत्त्यांचा व शास्त्रज्ञाचा आहे. हें आपण विसरता कामा नये ! तथापि पाश्चात्य पंडितानीं प्रयोगाच्या साह्यानें जो सिद्धात दोन वर्षापूर्वी ठरविला, तोच सिद्धात हजारों वर्षांपूर्वी आमचे वेदात ग्रथात नमूद होऊन राहिला होता. प्राचीन उपनिपत्कारानीं विचाराच्या जेोरावर हेंच आत्म्याचे स्वरूप सागून ठेवले. पण नवीन शिक्षणानें मंडळीस हा वेदातांतील सिद्धात चुकीचा वाटून आमच्यातील पुष्कळ लोक पाश्चात्यानीं तयार केललीं मतें जशीच्यातशीच ग्रहण करून जडवादी बनलेले आढळतात. नवीन लोक असे दुस-याच्या ऑजळीनें पाणी पिणारे, तर जुने शास्त्री सनातन ग्रंथांवर हवाला देऊन स्वस्थ बसणारे ! दोघेही डबक्यात सांचलेल्या पाण्याप्रमाणे आहेत. दोघाच्याही ठिकाणी जिवंत झरा नाहीं. ज्या वेळीं युरोपीय जडवादाची मते इकडे आलीं त्या वेळी तीं खरी किंवा आपलीं वेदांतांतलीं मतै खरीं याबद्दल प्रयोग करून आपणासच याचा उलगडा करतां आला नसता काय ? ह्या प्रयोगाना उपकरणसामुग्री तरी कांहीं विशेष लागत होती ? नरसेोबाच्या वाडीस अंगांत होणारे भूतसचार किंवा अपस्माराचे रोगी थेोर्ड सापडतात काय ? कदाचित् आपलेकडे अशा लोकाचे प्रमाण वाजवीपेक्षा फाजीलच आहे ! तथापि ही शोधक बुद्धि आमच्यात उत्पन्न झालेली नाहीं. कोणताही सिद्धात शास्त्राच्या कसोटीस लावल्याशिवाय तो हृल्लीच्या काळीं ग्राह्य होणे फारसें शक्य नाहीं. अशी शोधकबुद्धि बुद्धिदाता गजानन आपल्या हृदयात उत्पन्न करो, अशी माझी प्रार्थना आहे. حمه

  • वेदान्ताची आणि उद्योगाची दिशा.

महात्मा अगम्यगुरु याचे शिष्यत्व पत्करलेल्या मिसेस स्टॅनर्ड यांनीं गेल्या आठवड्यात येथ जीं तीन व्याख्याने दिलीं व स्वामींचे येथील बयाच मंडळींबरोबर जें बोलणेंचालणें झाले, त्यावरून आमच्या शहरातील लेोकाच्या मनात जर स्वामीस विवक्षित अशा रीतीची जागृती उत्पन्न झाली तर त्यांच्या आगमनापासून आम्हांस पुष्कळ कायमचा फायदा झाला असें आम्हीं समजूं. स्वामी अगम्यगुरु

  • (केसरी, ता. २७ माहे फेब्रुवारी १९०६ ).