पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/501

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?く? लो० टिळकांचे केसरींतील लेख. यांची माहिती गेल्या व आजच्या अंकांत आलेलीच आहे. इंग्लंड व अमेरिका यासारख्या देशांतील केवळ पैशाच्या पाठीमार्गे लागलेल्या माणसास देखील आपल्या चमत्कारिक योगशक्तीने वेदात व योग याच्या तत्त्वाकडे नजर पोंचविण्यास किंवा त्याचे मनन करण्यास स्वामीनीं लावलेले आहे; व विलायतेंत लंडन व बर्मिंगहॅम येथे त्यांनीं वेदाताच्या चर्चेसाठी कमिट्या स्थापन केल्या असून त्या कमिट्याचे हल्लीं बरेच सभासद झाले आहेत.स्वामीची अशी समजूत दिसते की,अशा रीतीनें वेदाताच्या रवया ज्ञानाकडे मनुष्याची प्रवृत्ति झाली म्हणजे तो आपपर भेद मनात न आणतां गाजलेल्या लोकाशी सहानुभूति दाखवून गाजणाच्या विरुद्ध त्यास मदत करण्यास तयार होतो. विलायत किंवा अमेरिका या दोन्ही देशात अथवा सामान्यतः पाश्चिमात्य राष्ट्रात आमच्याबद्दल जर काहीं सहानुभूति उत्पन्न करावयाची असेल तर त्यास हाच राजमार्ग आहे, आणि या मार्गानें सत्याचा अधिक प्रसार होऊन आपले काम जितके अधिक वठेल तितके दुस-या त-हेर्ने कधींही वठणार नाहीं. उदार बुद्धाचे पुरुष सर्व देशात कमीअधिक प्रमाणानें असावयाचे व असतात. परंतु गाजलेल्या लोकाबद्दल त्याची सहानुभूति उत्पन्न करण्यास सदर लोकाचे व त्याचे विचार कांहीं बाबतीत तरी एक असले पाहिजेत. अशा प्रकारचे विचार दोघांच्याही हिताचे सत्य म्हणून दोघांसही मान्य होणारे वेदांताखेरीज दुसरे ठिकाणीं सापडणें कठिण आहे, आधिभौतिक शास्त्राची अलीकडे जी झपाट्यानें वाढ होत आहे व परमेश्वर, आत्मा आणि जगत् या त्रिपुटीच्या स्वरूपाबद्दल सदर शास्त्रांच्या ज्या नव्या नव्या कल्पना प्रत्यहीं प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांत वेदाताच्या प्रसाराचे काम एरव्ही अवघड पडले असतें तें उत्तरोत्तर सुलभ होत चाललें आहे. खिस्तीधर्म हा काही तत्वज्ञानाच्या पायांवर रचलेला नाही, इतर्केच नव्हे तर सदर धर्माचे मूलभूत असे जे काही सिद्धात आहेत तेही आधिभौतिक शास्त्रांच्या तत्त्वांशीं ब-याच अॅशीं विरुद्ध आहेत, असें तिकडील लोकाच्या नजरेस आले आहे. सुदैवानें वेदाताची गोष्ट अशी नाही. ज्या तत्त्वांच्या पायांवर वेदांताची इमारत उभारली आहे व जीं तत्त्वे कधीं युक्तीनें तर कधी दृष्टांतानें, कधीं श्रुतिबलानें तर कधी अभ्यास आणि वैराग्य याच्या साहाय्यामुळे एकाग्र केलेल्या मनाच्या प्रेरणेनें आमच्या पूर्वजानीं सिद्ध केलेलीं आहेत; ती हल्लींच्या आधिभौतिक शास्त्रानेंही सिद्ध होण्याचा प्रसंग अगदीं नजीक येऊन ठेपला आहे, असे म्हटले तरी चालेल. आधिभौतिक शास्रज्ञांच्या तत्वविचाराचे पर्यवसान अद्याप कायमचे झालेलें नाहीं, म्हणून वेदांताची तत्वे अमक्या एका विशिष्ट आधिभौतिक शास्त्राच्या तत्वाशीं सध्याच्या स्थितीत तंतोतंत मिळणार नाहीत, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यामुळे वेदाताच्या तत्वाची काहीं हानी होत नाहीं. आधिभौतिक पाश्चात्य शास्रज्ञाच्या तत्वविचाराची दिशा अलीकडे कशी पालटत आहे व तिचे धोरण काय आहे इकडच सध्या आपणाला लक्ष पुरवावयाचे आहे; आणि तें धोरण काय हें मिसेस स्टॅनर्ड यांनी आपल्या दुस-या