पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/517

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Ч о с लो० टिळकांचे केसरींतील लेख. करणार ! आणि तो कितीही विद्वान् असली तरी त्याच्या तोंडांतून तुकारामबुवासारखी प्रासादिक वाणी केोठून निघणार ! प्रार्थनासमाजासारखे किंवा एकेश्वरीसारखे कांही धर्मपथ काढण्याचा प्रयत्न इंग्रजीत झाला आहे. पण ख-या धर्मकळकळीचा कोणीच पुढारी या पंथात नसल्यामुळे लोकांस धार्मिक उपदेश करण्याच्या कामीं मराठी भाषा वापरल्याने भाषेची जी अभिवृद्धि व्हावयाची तीही या पंथाकडून झालेली नाहीं. मिशनरी लोकानीं मराठी भाषेस हातीं धरून भाषेचा कोश व व्याकरण करण्याच्या कामीं मदत् केली; व छापण्याची कला आणि वर्तमानपत्रे याचाही महाराष्ट्रांत प्रचार सुरूं केठा. पण मिशनरीच्या ग्रंथांत मराठी शिकलेल्या साहेबलीकानीं वापरलेली भाषा खया मराठी भाषेपेक्षा विचित्र असल्यामुळे मराठी भाषेच्या अभिवृद्धीस मिशनच्याचे व्हार्वे तसें साहाय्य झालें नाहीं, व मिशनच्याचे हे धडगुजरी भाषेतील मराठी ग्रंथ मराठी वाङ्ममयास कधीही शोभादायक व्हावयाचे नाहीत, किंबहुना हे ग्रंथ खच्या मराठी वाङ्मयाचा भाग कधीही समजला जाईल कीं नाहीं, याची शेका आहे. परकीय राजूसतेमुळे देशातील लोकाचा सर्व बाजूने हुरूप कमी झाला आहे, व खरी कर्तबगारी कदाचित् कोणाच्या अंगों असल्यास ती दाखविण्यास मार्गही राहिला नाहीं. अशा स्थितींत खच्या कवित्वाची स्फूर्ति तरी कशी होणार? आणि झाल्यावर पोवाडे तरी कोणाचे गाणार ? साराश, खरा कवि किंवा खरा धर्मोपदेशक निपजण्थास हा काल प्रतिकूल असल्यामुळे सावलीखालील झाडाप्रमाणें या दिशेनें मराठीची वाढ इंग्रजी राज्यांत खुटली गेली आहे. हिंदुस्थानची राष्ट्रीय भूपा मराठी होणे शक्य नाही. अर्थात् या बाजूतेंही मराठी भाषेची वाढ होईल अशी आशा बाळगावयास नको. उलट हिंदीसारखा दुसरी एकादी भाषा राष्ट्रीय झाल्याने मराठी भाषेस त्या मानाने धक्काच बसावयाचा. भाषेची आभवृद्धि होण्यास ती भाषा बोलणाराचा व्यवहार व व्याप अधिक वाढला पाहिजे, परंतु वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र देशाची आज स्थिति तशी नसल्यामुळे मराठी भाषेतील ज्ञानभाडार इंग्रजी अमदानीस ८० वर वर्षे झालीं तरी अद्याप संकुचितच राहिले आहे. मिशनरी लोक व इंग्रजी कामगार यांस मराठी भाषा शिकण्याकरितां आणि गांवोंगांवच्या शालोपयोगी कामाकरितां जे ग्रंथ अवश्य होते तितके अव्वल इंग्रजीत प्रथमतः तयार झाले, आणि कांहीं मनेोरंजक इंग्रजी ग्रथाचीं मराठी भाषातरं झालीं. यापेक्षा अव्वल इंग्रजींत मराठी भाषेची जास्त आभवृद्धि झाली नाही. मराठी स्वतंत्र गद्यरचनेच्या कालास यापुढे म्हणजे कै. विष्णुशास्री याच्या निबंधमालेपासून सुरुवात होते. यापूर्वी विष्णुशास्त्र्यांप्रमाणेंच किंवा त्यांच्यापेक्षां वरचढीचेही पुष्कळ विद्वान् झाले होते. पण स्वभाषेच्या द्वारें आपली भाषा बोलणारांचीं मनें एखाद्या विशिष्ट विषयाकडे लावण्याचे किंवा एखाद्या विशिष्ट मार्गापासून परावृत्त करण्याचे काम आंगावर घेण्याची यापूर्वी कोणासही जरूर अगर कळकळ वाटली नव्हती. विष्णुशास्री