पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/527

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

닐《o लो० टिळकांचे केसरींतील लेख. कीं, “ थेबें थेबें तळे साचे ” या न्यायानें पैसाफंडाची जरी उपपत्ती लागली तरी हे पैसे गोळा करणे शक्य नाहीं. रा. रा. अंताजी दामेदिर काळे यांनीं पदरची झीज सेोसून ही कल्पना शक्य आहे असें आतां शाबीत केले आहे. तथापि, अद्याप या बाबतीत पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या असून त्याला लेोकांच्या साहाय्याची, सहानुभूतीची आणि उद्योगाची फार जरूर आहे. ही सहानुभूति किंवा उद्योग कोणत्या रीतीनें करता येईल याचा विचार आज करावयाचा आहे. गेल्या सालीं पैसाफंड गोळा करण्याकरितां कांहीं गृहस्थांनी आपल्या पदरच्या खचर्नेि रा. रा. शंकर गणेश लवाटे यास पुणे जिल्ह्यांतील जुन्नर तालुक्यांत पाठविले होते. तेथे जेो अनुभव मिळाला त्यावरून एवढी गोष्ट सिद्ध आहे कीं, पैसाफंड गोळा करण्याकरितां पगारी उपदेशक किंवा कामगार नेमून कधीही काम भागणार नाही. या उपदेशकास रेल्वेभार्ड किंवा वाटखर्च देऊन त्याखेरीज त्याच्या योग्यतेप्रमाणें पगार दिला तर पैसाफंडाच्या वसुलापैकीं निदान ऐशीं टक्के तरी खर्च झाल्याखेरीज राहाणार नाहीत. अर्थात् गाईच्या अचळातून निघालेलें दूध आचळांस लावण्यातच खर्च होणार; मग फायदा काय ? पैसाफंड दहापाच उपदेशकांचा पगार व खर्च देण्याकरितां कांहीं काढलेला नाहीं. मुंबईइलाख्यात (सिंध धरून) एकंदर २३ किंवा खानदेशाचा विभाग झाल्यानें आतां २४ जिल्हे आहेत. या २४ जिल्ह्यांत सुमारे २८ हजार खेडीं आहेत; म्हणजे दर जिल्ह्यास हजार अकराशें खेडीं असून त्यात सुमारे ७-८ लाख वस्ती असते. इतकी खेडीं हिंडून इतक्या लोकांकडून दरसाल वर्गणी गोळा करण्यास दर जिल्ह्यास (एका खेड्यास एका माणसास प्रवासासुद्धां दोन दिवस या मानानें) वर्षभर काम करणारी नऊ दहा माणसें किंवा तालुक्यास एक मनुष्य पाहिजे. परंतु इतकीं माणसें ठेविलीं म्हणजे पैसाफंडाचे बहुतेक उत्पन्न त्यांच्या पगारांतच खर्च होणार हें निश्चित होय. बारीक सारीक खेडीं सोडून मोठमोठीं खेडीं ध्यावयाचीं असा जरी ठराव केला तरी दर जिल्ह्यास किमानपक्षीं तीन चार काम करणारी माणसे पाहिजेतच. जेिल्ह्यांतील सरकारी शाळा तपासण्याकरिता सरकारास सुद्धां याच मानानें डेप्युटी अगर आसिस्टंट नेमावे लागतात. अशा त-हेची व्यवस्था खर्चाची असल्यामुळे पैसाफंडाच्या कमिटीकडून होणे शक्य नाहीं. अर्थात् विचारांनीं पैसा गोळा होण्यास एकच उपाय शिल्लक राहिला. तो हा कीं, ठिकठिकाणच्या लोकांनीं स्वयंसेवक होऊन आपआपल्या गावची, आळीची किंवा पेठेची वर्गणी गोळा करून कमिटीकडे पाठवावी. सारांश, पैसाफंडाचा पैसा बिनखचीं खजिनदाराकडे जेव्हा येऊन पडेल तेव्हांच या फंडास पूर्ण यश येणार आहे. ही कामधेनु खरी; पण वसिष्ठाच्या कामधेनुप्रमाणें तिनें उदरनिर्वाहास लागणारा चारा रानांत हिंडून फुकट पैदा करून दूध मात्र वसिष्ठास दिले पाहिजे. मिशनरी लोकांचे विलायर्तत पैसाफंडासारखे जे फंड आहेत. त्यांचीही अशीच