पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/536

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारहूंस्यं. ५१९ या जगांत आढळून येणारे जे दोन मार्ग किंवा * निष्ठा '--सांख्य कर्मयोग या दोहोंपासूनच गीतेस सुरवात झाली आहे; व या दोन मार्गापैकीं ग्राह्य कोणता हैं। ठरावणें हाच गीतेंतील मुख्य विषय आहे. योग म्हणजे पातंजलयेोग नव्हे. सहाव्या अध्यायांतील काही लोक खेरीजकरून योग म्हणजे कमैयेोग हाच अर्थ गीर्तेत विवक्षित आहे हे * समत्वं योग उच्यते ? आणि * योगः कर्मसु कौशलम्’ या गीतेंतील व्याख्येवरूनच उघड होतें. किबहुना * योग ’ या शब्दाचा कर्मयोगाखेरीज दुसरा भलतासलता अर्थ कोणी करूं नये, एतदर्थच या व्याख्या दिलेल्या आहेत असे म्हटलें तरी चालेल. पुरुष ज्ञानी झाला म्हणजे तो (१) शुकाचार्याप्रमाणे कर्मे सोडील, किंवा (२) जनक- श्रीकृष्णाप्रमाणें सर्व व्यावहारिक कर्मे निष्कामबुद्धीनें करील, असे दोन पक्ष संभवतात, व यासच अनुक्रमें सांख्य व योग या संज्ञा आहेत. पण हे दोनही पक्ष अर्जुनाला सागून काय उपयोग ? * तदेकं वद निश्चित्य ’ यापैकीं कांहीं तरी एक मला निश्वर्येकरून सागा, असें भगवंताजवळ त्याचे मागणें होतें. म्हणून त्यास उत्तर देतांना पाचव्या अध्यायात कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोनही जरी एकसारखेच निश्रेयस्कर म्हणजे मोक्षप्रद आहेत तरी * तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते '--या दोहोंत कर्मसंन्यासापेक्षां कर्मयोगाची मातब्बरी आधिक,--असें भगवंतानीं स्वच्छ सागितले आहे. आणि ही योग्यता अधिक कां ? याची कारणे तिस-या व चैौथ्या अध्यायांत आहेत. या अध्यायामध्यें भगवान् असे सांगतात कीं, कोणी मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी निजणें, बसणें, उठणे इ. कमें त्याला कधीच सुटत नाहीत. सृष्टि उत्पन्न झाली तेव्हा यज्ञचक्र उत्पन्न झाले; आणि यझें जर कमांखेरीज होत नाहीं तर कर्म सोडणे म्हणजे यज्ञचक्र बुडवून ब्रह्मदेवाची गुन्हेगारी करणें होय ! आता कोणी असे म्हणेल कीं, ज्ञानी झाला म्हणजे त्याला मोक्ष मिळाला; मग त्याचे काहीं कर्तव्य उरत नाही ( कार्य न विद्यते) किवा त्यानें कांहीं केलें काय न केलें काय सारखेच असतें, (अ. ३ लेो क १७- १८ ). कित्येकांच्या मतें हाच गीतेचा सिद्धात पक्ष होय. पण हा अर्थ प्रकरणास जुळत नाहीं. प्रकरण कर्मयोगाचे आहे; आणि ज्ञानी पुरुषानेंही कर्म केलें पाहिजे हा अर्थ (अ. ३ -२५) या ठिकाणीं प्रतिपाद्य असून तत्सिद्धयर्थ जनकादिकांचा व पुढे खुद्द भगवंतांनी आपलाही दाखला दिला आहे; म्हणून ज्ञानी पुरुषार्ने काही करूं नये असें मध्येंच विधान करणे शक्य नाहीं. यासाठीं * ज्ञानी पुरुषाचे काही कर्तव्य शिल्लक राहिलें नसतें, त्यार्ने एखादी गोष्ट केली काय न केली काय सारखेंच ’ हा पूर्वपक्षाचा किंवा हेतूचा अनुवाद घेतला पाहिजे, आणि त्याचे उत्तर काय हें पुढील ठीकांत * तस्मात् ’ हें कारणबोधकपद घालून सांगितलें आहे. ज्ञानी पुरुषाला कर्म करणें न करणें जर सारखेंच तर न करण्याचा तरी आग्रह कां ? केव्हांही झाले तरी ** कर्म ज्यायोह्यकर्मण:”- अकर्मा ६५