पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/542

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारहस्य. ५२५ आहे. यासच भागवतधर्म असे म्हणतात. भागवत व स्मार्त या शब्दाचे अर्थ व्यवहारांत कांहीं लोक अनुक्रमें वैष्णव व शैव असा करितात. पण हे अर्थ खरे नव्हत. भागवत भागवताची उपासना करणारे असतात हें खरें; पण शिवाची उपासना भागवतात अमान्य नाहीं हें * येप्यन्यदवताभक्ता ’ या गीतेतील लोकावरून उघड होतें. तसेंच स्मार्त म्हणजे केवळ शिवोपासक असतात असेही नाहीं; कारण आमच्याकडील स्मातांमध्ये पंचायतनाची पूजा चालू असून स्मार्त मागांचे प्रवर्तक जे आद्य श्रीशंकराचार्य त्याच्या मठातील उपास्य दैवतही शिव नसून शारदा आहे. यावरून स्मृत्युक्त आश्रमव्यवस्थेप्रमाणें चालून अखेर कर्मत्यागरूपी सन्यासाश्रम घेणे हें मनुष्याचे कर्तव्य होय, असें मानणारे लोक स्मार्त आणि अखेर कर्मत्यागरूप संन्यास घेण्याची जरूर नसून तें काम फलाशासंन्थासार्नेही तितकेच सिद्ध होतें असे जें भगवताचे मत तें जे ग्राह्य मानतात ते भागवत,--असे या दोन शब्दाचे मूळ अर्थ असाव हे उघड होते. पहिल्या पंथास स्मार्त किंवा साख्यमागीं हे नाव आहे आणि दुस-या पंथास भागवतधर्म किवा कर्मयेोग असे म्हणतात. वस्तुतः पाहिले तर गीता भागवत मार्गाची आहे, स्मार्तमार्गाची नव्हे, तथापि या दोन मार्गाबद्दल तंटा करीत बसण्यात हंशील नाहीं. कर्माचा संन्यास केला काय आणि फलाशेचा सन्यास केला काय, संन्यासाचे म्हणजे निवृत्तीचे तत्त्व दोनही ठिकाणी एकसारखेच कायम राहात. * एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति --अशी समबुद्धीने या दोन मार्गाची एकवाक्यता गीतेंत केली आहे. भागवतपुराण हा भागवत धर्मावरील हल्ली मुख्य ग्रंथ समजतात; पण ऐतिहासिक दृष्टया तो भारतानंतरचा आहे हे त्यातील पहिल्या अध्यायाच्या कथेवरूनच उघड होते. म्हणून मूळचा भागवतधर्म गीतेचाच होय. त्यात केवळ भक्तीला प्राधान्य दिलेले नसून भक्तीने अत:करणशुद्धि झाल्यावर निष्काम कर्म केलेंच पाहिजे. ‘मामनुस्मर युद्धय च' असा दुहेरी उपदेश आहे. भागवतात निष्काम कर्माचे हे प्राधान्य न राहता भक्तीला प्राधान्य आले, असा फरक झाली आहे. भागवतधमांचे हें दुसरें स्वरूप होय. यात अद्वैतवेदात कायम होता. पण तोही पुढे काढून टाकून गीतेंत अद्वैताऐवजीं विशिष्टाद्वैताचा भक्तीशीं मेळ घातला आहे असे रामानुजानी ठरावले आहे, आणि अद्वैत किंवा विशिष्टाद्वैतही गीतेंत प्रतिपाद्य नसून द्वैतवेदातच गीतेत प्रतिपाद्य आहे असें मध्वाचार्याचे म्हणणे आहे. पण आमच्या मते हे साप्रदाय एकदेशी असून अद्वैतज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोगच गीतेंतील मुख्य प्रतिपाद्य विषय होय. केवळ ज्ञान व सन्यास अगर केवळ भक्ति गीर्तत प्रतिपाद्य नाहीं. सारांश, गीतेंतील उपदेश परलोक आणि इहलोक या दोहाँतील कार्य साधण्यासाठी सांगितलेला आहे, नुसत्या परलेोकासाठी नव्हे, हे सर्वानीं लक्षात ठेवण्यासारखें आहे. कर्मसंन्यासानें मोक्ष मिळत नाही असे नाहीं; परंतु लोक