पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/544

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कै० गोपाळराव गोखले, ५२७ सर्वाचे मूळ सर्वभूतात्मैक्यबुद्धि असल्यामुळे ती बुद्धि प्रथम संपादन करा आणि मग व्यवहारांत जीं कर्मे प्राप्त होतील त्यांचा समबुद्धीनें विचार करून तीं करीत जा, असें गीताधर्म कंठरवान सागत आहे. आणि मनुष्यमात्राच्या अंगीं अस णा-या बुद्धि, (ज्ञान) श्रद्धा (भक्ति) आणि कर्म या तीन वृत्तींची अशा रीतीनें जितकी सुंदर जोड घालतां येते तितकी दुस-या कोणत्याही शास्त्रीय पद्धतीनें घालतां येत नाहीं, असें माझे मत आहे. माझ्या ग्रंथाचा सारांश काय हे यावरून सामान्यतः लक्षांत येईल. यावर पुष्कळ शंका घेण्यासारख्या आहेत, नाहीं असें नाहीं. कारण निष्काम कर्मयोगाला मी देती तितकें महत्त्व टीकाकार देत नाहींत हे मला माहीत आहे पण माझ्या मतांवरील सर्व शंकांचीं उत्तरें येथे देणे शक्य नाही; त्यासाठीं समग्र ग्रंथच वाचला पाहिजे व तो शक्य तितका लवकर प्रसिद्ध करण्याची व्यवस्था मी करीत आहें. थोडक्यांत सांगणे असल्यास ब्रह्मविद्यामूलक भक्ति गीतेंत प्रतिपाद्य आहे, इतकेंच नव्हे तर त्याबरोबर तितक्याच योग्यतेचा निष्काम कर्मयोगही आवश्यक म्हणून प्रतिपादिला असल्यामुळे गीता हें ब्रह्मविद्यामूलक-भक्तिसहचारी नीतिशास्र होय, असें माझे मत आह.

  • कै० गोपाळराव गोखले

मुहूर्तं ज्वलितं श्रेयेो न च धूमायितं चिरं । ---महाभारत, ना, गोपाळ कृष्ण गोखले याना गेल्या शुक्रवारी रात्री सुमारें ११ वाजण्याचे सुमारास देवाज्ञा झाल्याचे वर्तमान ऐकून विस्मय, खेद, निराशा आणि इहलोकींच्या वस्तीचा अशाश्वतपणा याचा प्रत्यय येऊन, कोणाचेही मन उद्विग्न झाल्याखेरीज राहणार नाहीं. नामदार गोखले सुमारे तीन महिन्यांपूर्वी विलायतेहून येथे परत आले, तेव्हा त्याची प्रकृति फारशी बरी नव्हती हें लोकांस कळलें होतें. पण प्रकृतीचे हें अस्वास्थ्य कोणत्या प्रकारचे होतें, याची तेव्हां लोकांस माहिती नव्हती व करून देणेही इष्ट नव्हतें. आज सुमारें पंधरा वर्षाच्या मधुमेहानें याचे शरीर, दिसण्यांत चागले दिसत होतें तरी, अांतून बरेंच पोखरलेले हेोर्ते; आणि विशेषत: या रोगाचा त्यांच्या काळजावर जो परिणाम झाला होता, तो तर भयंकरच होता. केव्हा केव्हा मधून मधून त्यांच्या नाडीचे ठोके बंद पडत, किंवा रात्रीं निजले असता एकाएकीं श्वास कोडून घाबरून जाण्यापर्यंतही मजल येत असे ! रोग कोणताही असला तरी हीं लक्षणें कांहीं बरीं नव्हत, हें

  • (केसरी, ता. २३ माहे फेब्रुवारी १९१५ ).

६६