पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/549

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३२ लो० टिळकांचे केसरींतील लेख. देण्यांत आलें, व तत्पूर्वी मनेोरंजनानें मुद्दाम ‘ आगरकर-अंक ’ काढून या महात्म्याची सर्वोस ओळख करून दिली, याबद्दल आगरकराच्या सर्व मित्रांस व भक्तांस आनंदच वाटेल यात शंका नाही. प्रिं. परांजपे हे आगरकरांच्याच जागीं आलेले असल्यामुळे त्यांनीं आगरकरांच्या स्मरणार्थ भरविलेल्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावें यांत कांहीं नवल नाहीं. पण माजी न्या. सर चंदावरकर यांनीं ** आगरकर हे आमच्यापैकीं मोठे थोर पुरुष होते, त्याचे श्राद्ध करणें आम्हांस अत्यंत आवश्यक आहे, तसें न केल्यास राष्ट्राची हानि होईल. ” इ० उद्गार सभा सुरू हेोण्यापूर्वी काढलेले ऐकून पुष्कळांस चमत्कार वाटला असेल यांत शंका नाहीं. कॉलेजांतील अभ्यासक्रम संपल्यानंतर आजन्म दारिद्याची शपथ वाहून न्यू इंग्लिश स्कुलास मिळणारे आगरकर कोणीकडे ! आणि बी. ए. झाल्यानतर एलूएलू. बी., एल्एल्. बी. पास झाल्यावर वकिली, वकिली झाल्यानंतर जज्जशिप आणि जज्जशिप झाल्यावर दिवाणगिरी करणारे सर चेदावरकर कोणीकडे ! परंतु सत्याचा, करारीपणाचा, एकनिष्ठतेचा, आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण अहेि कीं, ‘‘ निःस्वीवष्टिशतं इाती दशशतं लक्षं सह्खाधिपः ” याप्रमाणे व्यावहारिकदृष्टया भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासही दारिद्यांत राहून पूर्ण एकनिष्ठेनें देशसेवेस लागणाच्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो. यावरून गोपाळराव आगरकर याचा मृत्युलेख लिहिताना, १८९५ सालीं आम्हीं जे उद्गार काढले होते ते किती समर्पक होते हे वाचकांच्या लक्षांत येईल. आगरकराच्या अगच्या विशिष्ट गुणाचे वर्णन करीत असतां आम्हीं तेव्हा असे लिहिले होतें कीं, कॉलेजातील अभ्यासक्रम पुरा करून सरकारी नोकरीत शिरणारे आणि शंभराचे हजार रुपये होण्याची हाव बाळगून ती पुरी झाल्यावर पेन्शन घेऊन घरीं स्वस्थ बसण्याचा प्रसंग येतो न येतो तोंच आपल्या चिरंजिवासही त्याच मार्गात ढकलून देऊन दोन पिढ्याची काळजी दूर झाली म्हणून आपणांस कृतकृत्य मानणारे युनिव्हर्सिटीचे पदवीधर काहीं कमी असतात असे नाहीं. पण आपल्या कर्तबगारीनें अशा प्रकारची व्यावहारिक उन्नतीही आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां आगरकराप्रमाणें मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटें, विपति, हालओपेष्टा सेोसूनही मी आपलें देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खर धीरपुरुष होत. सन १८९५ सालीं वरील आशयाचे जे उद्भार आम्ही काढले तेच अद्यापही आम्हांस खरे वाटतात व तेच पुन: त्याच रूपानें येथे नमूद करण्यास आम्हांस कांहीं दिक्कत वाटत नाहीं. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या मनावर आहे, केवळ कृतीवर नव्हे, हें तत्त्व केसरीत आलेल्या कांहीं महात्म्यांच्या निधनलेखनांत आम्हीं वेळोवेळी व्यक्त केलेंच आहे. मनुष्याची योग्यता ठरवावयाची असल्यास ती त्यानें किती ग्रंथ वाचले किंवा त्यानें किती पैसा संपादन केला एवढ्यावरूनच ठरत नाहीं. आगरकरांनीं जितके ग्रंथ वाचले असतील त्यापेक्षा अधिक ग्रंथ वाचलेले एम्. ए.