पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/551

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३४ लो ० टिळकांचे केसरीतील लेख. चरित्रकारांच्या मनात ही बुद्धि वसत होती असें दिसत नाहीं. गोपाळरावांचे हे चरित्रकार प्रायः सुधारणेची री ओढणारे आहेत; आणि केवळ सुधारणेसाठीं गोपाळरावास सत्पुरुषाच्या मालिकेंत गाँवण्यास तयार झालेले हे लोक आमच्या मतें कोत्या बुद्धीचे आणि एककल्ली होत. गोपाळरावांच्या अंगीं असामान्य गुण कोणता याचें सन १८९५ सालीं व आजच्या लेखात आम्ही पूर्ण निदर्शन केलें आहे. गोपाळरावजींचा आणि टिळकाचा काहीं बाबतीत कितीही जरी मतभेद असला तरी गोपाळरावर्जीची योग्यता टिळकाना पूर्ण अवगत होती हें दोघाच्याही मित्रांस पूर्णपणें माहीत आहे. पण तेवढ्यामुळे गोपाळरावजींच्या विरुद्ध जो पक्ष उपस्थित झाला तो केवळ * सवंग लोकप्रियतेच्या लालुचीनें झाला, अगर ‘सुधारक सत्यासाठीं तर केसरी व्यापारासाठी ’ इत्यादि अजागळ विधार्ने गोपाळरावजीच्या मृत्यूनंतर आज एकवीस वर्षानीं करणे म्हणजे लेखकाने आपल्या बुद्धीचे माद्य प्रकट करण्यासारखें आहे. वाद चालू असता असल्या प्रकारचीं वाक्शत्रे नेहमीं वापरण्यांत येतात, आणि तेव्हा ती बच्याच अंशीं वादाला पोषक आणि अवश्यही असतात. पण वाद संपून गेल्यानंतर असल्या शस्त्राचा वादातील नायकाच्या प्रतिपक्षावर उपयोग करणे म्हणजे बायकाच्या नथींतून तीर मारण्यासारखे असमंजस होय. शिवाय दुसरी अशी गोष्ट लक्षात आणली पाहिजे कीं, हल्लीं प्रसिद्ध झालेलीं आगरकराची चरित्रे प्रायः सुधारणेच्या एकाच गोष्टीला महत्त्व देऊन लिहिलेली आहेत. जणु काय सुधारणेखेरीज आगरकरानीं काहीच कामगिरी केली नाही किवा दुस-या विषयावर लिहिलेंही नाहीं. अर्थात् हल्लींच्या चरित्नकारानी आगरकरांच्या गुणाचे ज वर्णन केलें आहे तें आधळ्यानें हत्ती खांबासारखा आहे, अगर सुपासारखा आहे असे ठरविण्याच्या मासल्याचे झाले आहे. या सवाँस आम्ही असें विचारतों कीं, त्यानीं आगरकराची राजकीय मते काय होतीं याची कधी चौकशी केली आहे काय ? १८८८ सालापर्यंत केसरीत जे राजकीय विषयावर लेख आले ते बहुतेक आगरकराचे आहेत; आणि त्यानंतर सुधारकातही अशा प्रकारचे बरेच निबंध आले आहेत. या सर्वांचे सूक्ष्म निरीक्षण केले असता असे दिसून येईल की, आगरकर हे पक्के स्वराज्यवादी होते, आणि कै. विष्णुशास्री चिपळूणकराप्रमाणे देशातील दारिद्य, परावलंबिता, चांगल्या पुरुषाचा तेजेोभेग, गो-या अधिकाच्याची चरणी व वरणी, व्यापारनाश वगैरे राजकीय व औद्योगिक अवनति पाहून त्याचे चित्त केशवपनादि चालीच्या निरीक्षणापेक्षांही अधिक संतप्त व दुःखित होत असे; व याला मिल्ल आणि स्पेन्सर यांनीं प्रतिपादन केलेल्या स्वराज्याच्या तत्त्वाखेरीज दुसरा उपाय नाही अशी त्याची पक्की खात्री झालेली होती. मिल्लने ज्याप्रमाणे आपली लेखणी केवळ स्रोस्वातंत्र्यावरच चालविली नाही तद्वतच आगरकराचीही गोष्ट आहे, आणि जो तार्किकपणा समाजसुधारणे संबंधानें त्यांच्या अंगी वसत हाता तोच तार्किकपणा त्यानी राजकीय बाबीवरील आपल्या लेखांतही पूर्णपणे उपयोगांत आणला आहे. टिळक आणि आगरकर