पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/567

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ЧАЧА o लो० टिळकांचे केसरींतील लेख.

  • वैदिकधर्म व बौद्धधर्म

कोलंबी येथे ता. ३ एप्रिल रोजीं क्रायटेरिअन नाटकगृहांत सर पी. अरुणाचलम् यांच्या अध्यक्षतेखालीं ली. बाळ गंगाधर टिळक याचे वरील विषयावर व्याख्यान झालें, श्रेोतृवृंदास व्याख्यात्याची ओळख करून देतांना सर पी. अरुणाचलम् म्हणाले, लो. टिळकांचा श्रेोतृगणास परिचय करून देण्याचे कारणच नाहीं इतकें लोकमान्यांचे नाव सर्वतोमुखीं झाले आहे. रा. टिळकांचा बहुतेक सर्व वेळ राजकारणात जातो, तरीपण त्यांच्या मनाचा नैसर्गिक कल वाङ्मयाकडे आहे. प्रोफेसर, ग्रंथकार, वृत्तपत्रकार अथवा राजकारणीपुरुष यांपैकी कोणत्याही नात्यानें पाहिले तरी त्यानीं आपले आयुष्य देशसेवेलाच वाहिले आहे. ज्या संकटानें इतर लोकांचे मन खचून गेले असतें अशा संकटांतदेखील त्याचे धैर्य अढळ राहिलें आहे. ओरायन व गीतारहस्य या अप्रतिम ग्रथांवरून यांची तीव्र बुद्धिमत्ता सवीस दिसून आली आहे. अशा विख्यात विद्वानाचे व्याख्यान आज आपणास ऐकावयास मिळत आहे हें आपलें सुदैवच होय. यानंतर ली. टिळक हे भाषण करावयास उठले. ते म्हणाले आज तीन महिने मी राजकीय विषयावर बोलून बोलून कंटाळली आहें म्हणून मीं आज हा धार्मिक विषय घेतला आहे. हा विषय निवडण्यात माझा दुसरा एक हेतु असा आहे कीं, बौद्ध धर्माविषयीं येथील विद्वानाचे विचार मला कळतील. असो. कित्येकाच्या मर्त बौद्धधर्म हा सर्वात जुना धर्म आहे व हे पंडित असेही म्हणतात कीं, पालीभाषा ही संस्कृत भाषेच्या आधींची होय ! युरोपिअन तज्ज्ञात दोन वर्ग आहेत. कित्येकानीं आधीं खिस्तीधर्माचे अध्ययन करून नंतर बौद्धधर्माचे अवलोकन केले, तर इतरानीं आधीं वैदिकधर्माचा अभ्यास करून नंतर बौद्धधर्माकडे दृष्टि वळविली. या रीतीनें ज्याचा जसा अध्ययनक्रम तसा त्याचा दृष्टिकोण बदललेला दिसतो. मला या सर्व मताचा विचार आज कर्तव्य नाहीं. वैदिकधर्म व बौद्धधर्म याचा परस्परावर कोणता परिणाम घडला एवढेच आपणास आज पाहावयाचे आहे. वैदिकधर्म, वैदिक-आचारविचार आणि वैदिक-तत्त्वज्ञान या सर्वोचा उगम व प्रचार बौद्धधर्माच्या अगोदरचा आहे ही गोष्ट ऐतिहासिक दृष्टया सिद्ध झालेली आहे. बौद्धधर्माचा उदय होण्यापूर्वीच्या वैदिकधर्मात यज्ञयागविचार आणि तत्त्वज्ञानविचार असे जे दोन भाग होते त्यांतील यज्ञयागादी भागाला सक्षेप देऊन बौद्धिक, अध्यात्मिक, नैतिक उन्नतीकडे बौद्धधर्मानें अधिक लक्ष पुरविलें आणि या बौद्धधमांचा वैदिक धर्मावर बराच परिणाम झाला. बौद्धधर्मानें आत्म्याच्या अस्तित्त्वाचा निषेध केला आहे असें नसून त्या भानगडीत न पडतां त्या धर्मानें केवळ नैतिक उन्नती व सामाजिक कर्तव्य यांकडे लक्ष पुरविले. बौद्ध धर्मानें वैदिक धर्मातली संन्यासाची कल्पना स्वीकारली परंतु

  • (केसरी, ता. १६ एप्रिल १९१८)