पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/581

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६४ लो० टिळकांचे केसरींतील लेख. यांनीं अखेरीस ली. टिळक यांस उपसंहारात्मक भाषण करण्यास जेव्हां सूचना केली तेव्हां या बेजबाबदारांनीं बराच पोरवडा सुरू केला. टिळक बोलण्यासाठी म्हणून सभेस गेले नव्हते, पण आग्रहामुळे ते शेवटीं बोलण्यास उभे राहिले. परंतु वरीलप्रमाणें बंडाळी चालू झाल्यामुळे अध्यक्ष प्रेो. भागवत यास कोणत्याच ठरावावर मर्ते न घेतां अखेर सभा बरखास्त करावी लागली. एतावता अखेर काय झालें ? तर ज्या मतदार-संघाकडे हा प्रश्न जाऊं नये अशी सभेतील काहीं लोकांची इच्छा होती, त्याच मतदारसंघाकडे हा प्रश्न अखेर नेणें आतां भाग आहे कारण तेवढाच काय तो या बाबतीत शहर-म्युनिसिपालिटीला अखेरचा कायदशार मार्ग शिल्लक राहातो. टिळक सांगणार होते तें हेच; आणि तेंच निराळ्या पर्यायाने घडून आले. बारा तेरा हजारांचा मतदार-संघ फार मोठा आहे असें नाहीं; आणि रीतसर कार्ड पाठवूनही त्याच्याकडून मते मागविण्यास दोनतीनशें रुपयांपेक्षां म्युनिसिपालेिटीस अधिक खर्च येणार नाहीं. येवढा खर्च किंवा मतदाराची मतें घेण्याची व्यवस्था म्युनिसिपालिटी सहज करूं शकेल. स्वराज्याच्या नवीन युगात जें कांहीं आम्हांस अजून शिकावयाचे आहे तें हेंच होय. मतदार-संघ हा या युगातील राजा आहे. आणि तो अापल्याकडे वळवून घेणें हें पुढाच्याचे कर्तव्य होय. मग त्याकरिता कधीं पड खावी लागल्यास खाल्ली पाहिजे, आणि कधीं * त्वयार्ध मयाधे ' करण्याचा प्रसंग आल्यास तोही शहाण्या पुरुषाने पत्करला पाहिजे. कारण मध्यंतरी किंचित् पीछेहाट दिसली तरी समुद्रातील भरतीच्या लाटेप्रमाणें मतदार-सघ-सत्ताक--स्वराज्याची लाट अखेर नेहमीं पुढे पुढेच जाईल याबद्दल आम्हास बिलकूल शंका वाटत नाहीं. पण तसे घडण्यास पूर्वीच्या प्रयत्नाची दिशा आता पालटावी लागेल आणि ती कोणत्या तन्हेनें पालटली पाहिजे याचे दिग्दर्शन करण्यासाठीं या स्थानिक विषयास आज या अग्रलेखांत जागा दिली आह.