पान:वंचित विकास जग आणि आपण (Vanchit Vikas Jag ani apan).pdf/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

रुबल्स सरकारने दिले. उर्वरित निधी, पक्ष संघटना, ट्रेड युनियन्स, शेतकरी संघटना, जनता यांनी दिला. यासाठी ‘बालआयोग', 'बालमित्र' सारख्या संघटनांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लॉटरी, देणगी इत्यादीद्वारे प्रयत्न केले
  पुढे बाल आयोगामार्फत कारखाने, कार्यशाळा, टपाल कचेच्या, कंपन्या सुरू करण्यात आल्या. त्यात बाल सुधारगृहातील १४ हजार बालकांना सामावून घेण्यात आले. या सर्व व्यवस्थेतून येणारा फायदा अनाथ मुलाच्या संगोपनावर खर्च करण्यात येई. हा आयोग मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अर्थसहाय्य, साधने, हमी इत्यादी देई. अनाथ मुलांची काळजी वाहण्याचे कार्य केवळ बाल आयोगच करीत होते असे नाही. त्यांना शेकडो कारखाने, लाल फौज, लष्करी देखरेख खाते, कोम्सोमोल (युवक संघटना), कामगार संघटनांसारख्या सार्वजनिक संस्थाही साहाय्य करीत. थोडक्यात, सारा देशच या मुलांचा पालक झाला होता.
 हे सारे चित्र पाहात असताना एक प्रश्न राहन-राह्न मनात येतो तो असा की, प्रतिकूल परिस्थितीत विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रशिया अनाथ मुलांसाठी जे करू शकला नाही ते अनुकूल परिस्थितीत त्याच शतकाच्या अखेरीस का असेना, आपणास का करता येऊ नये? अजूनही अनाथ, निराधार, बालगुन्हेगार बालकांविषयी आपल्या मनात हवी तितकी जाण नि। जागृती निर्माण झाली नाही हेच खरे. या क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांनी आपल्या राज्यात गेल्या ७० वर्षांत फार मोठे काम केले. परंतु या सर्वच संस्था आर्थिक
 ओढगस्तीच्या स्थितीतून वाटचाल करीत असल्याने समाज, शासन, दानशूर, ट्रस्ट, साखर कारखाने, सहकारी संस्था, संघटना यांनी आपल्या निधीतील काही वाटा कायमस्वरूपी अनाथांचे संगोपन कार्य करणा-या बाल कल्याण संस्थांना दिला पाहिजे; तसे झाल्यास येथेही अनाथांची स्वप्ननगरी साकारू शकेल.(नादेझ्दा अझिंगखिना लिखित ‘ऑल चिल्ड्रेन आर अवर चिल्ड्रेन' या रशियन पुस्तकाच्या आधारे)

◼◼


वंचित विकास जग आणि आपण/१११