पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

रंगांत घालावे म्हणजे रंग टिकाऊ होतो. हा रंग सुती धुपट कपड्यांस दिला असतां उत्तम केशरी रंग होतो. कागदावर काढलेल्या चित्रांना पिवळा रंग देण्याच्या कामीं कोणी कोणी या रंगाचा उपयोग करतात. सुकविलेल्या दांड्यांप्रमाणे ओल्या दांड्यांचाही रंग होतो. पारिजातकाचे फुलांपासून अत्तर काढितात. या झाडाला वाटोळ्या व अगदी चपट्या बिया येतात. कांहीं कांहीं औषधांत या बियांचा उपयोग करतात.

--------------------
१२ हरभरा.

 हरभऱ्यांचे ( धान्याचे ) उपयोग सर्वांना महशूर आहेतच. त्याबद्लच माहिती कोणास सांगितली पाहिजे असे नाही. या भागांत फक्त हरभऱ्याचे झाड़ासंबंधानें कांही माहिती सांगावयाची आहे. पौष व माघ महिन्याचे सुमारास हरभरा फुलू लागतो. फुले येण्याचे पूर्वी हरभऱ्याचे झाडाचा कोंवळा पाला खुडून त्या ओल्या पाल्याची अथवा तोच पाला वाळवून त्या वाळलेल्या पाल्याची भाजी करितात. पाला खुडल्याने झाड कमजोर न होतां उलट जास्त जोरदार होते; म्हणजे पाला खुडणे हे फायदेशीर आहे. हरभऱ्याची झाडे घाट्यास आली म्हणजे त्याची आंब धरितात. ही हरभऱ्याची आंब फार औषधी आहे. आंब जितकी ज्यास्त जुनाट असेल तितकी गुणाला ज्यास्त असते. आंब जो जो जुनाट होत जाते, तों तो तिला ज्यास्त तांबडा रंग येत जाते. हरभऱ्याची आंब अग्निदीपक, रुच्य, आत आंबट व दांतांना आंबवणारी असून, पटकी, अजीर्ण, पोटदुखी यांवर फारच वस्ताद आहे. अजीर्ण झाले असतां रोग्याचे शक्तीचे मानाने एक तोळापर्यंत आंब घेतल्याने ताबड़तोच गुण येतो. दुसरे कोणतेही औषध घेण्याची गरज नाहीं. पारा एक भाग, गंधक दोन भाग, लोभस्म अर्धा भाग, पिंपळी अर्धा भाग, पिंपळमुळ सव्वा भाग, लवंग अर्धा भाग, संचल एक भाग, स्वागी दोन भाग, व मिरी दोन भाग, या सर्वांचे एकत्र चूर्ण करून हरभऱ्याचे आंबीत सात दिवस खल करून त्याच्या तीन वालांची एक गोळी, अशा गोळ्या करून ठेवाव्या; यांपैकी एक गोळी उष्णोदकांत दिल्याने अग्निमांद्य, अजीर्ण, विषुचिका वगरै विकार ताबडतोब नाहीसे होतात, असे रा ० दीक्षित हे आपल्या वैद्यकलानिधी नामक पुस्तकांत लिहितात. अशाप्रकारे आंब ही औषधी वैद्यकशास्त्रांत फार महत्त्वाची मानली आहे. हरभऱ्याचे झाडावरीळ आंब धरणें हें काम थोडे कठीण आहे. कारण आंबीचे फडके हाताने पिळल्यास आंबीच्या या हाताची त्वचा जळल्यासारखी होऊन चटका बसतो, आणि हातास घरे पडतात. तसेंच आंब धरण्याकरिता शेतांत जातांना अंगावरील कपडे नीट आवरून