पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/५४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

४४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

पळसपापडी निंबूच्या रसांत उगाळून कढवून लेप केल्यानं गजकर्ण बरे होते. राख करुन ती पाण्यांत कालवून ते पाणी वंध्या स्त्रीला पाजल्यास गर्भधारणा होते. असे या झाडाचे अनेक औषधि उपयोग आहेत. आतां औषधिकल्पलता नामक ग्रंथांत या वनस्पतीचे जे अनेक आश्चर्यकारक उपयोग सांगितले आहेत, त्यांपैकी एक दोन उपयोग सांगून नंतर या वनस्पतीचा व्यापारसंबंधी कोणता उपयोग होतो, त्याचबद्दलचा विचार करू.

  पातालंयन्त्रमाहृत्य पलाशतरुबीजकम् ॥
  निष्कद्वयमितं तैलं मध्वाज्येन समं पिबेत् ॥
  मासमात्रेण योगींद्रो नक्षत्राण्यपि पश्यति ॥
  अनेककालजीवी स्यात् प्रियमाणः सुरासुरैः ॥
      'श्री औषधी कल्पलता'
 याचा भावार्थ असा की, पळसाच्या बियांचे पाताळयंत्राने तेल काढून त्यापैकी आठमासे तेल, तूप व मध याबरोबर प्यावे, याप्रमाणे एक महिना केले असतां, योगीन्द्र दिवसा नक्षत्रे पाहूं शकतो; व पुष्कळ कालपर्यंत जगणारा असा होऊन देवदानवांना प्रिय होतो. अशाच प्रकारचे या वनस्पतीचे आणखी अनेक आश्चर्यकारक उपयोग सदर ग्रंथांत वर्णन केले आहेत.

 पळसाच्या मुळ्या ठेचल्याने त्यापासून एक प्रकारचे बळकट तंतु निघतात. मराठे लोक त्यास ' चवर ' असे म्हणतात. ते लोक या चवराचे उत्तम त-तऱ्हेचे गोंड़े बांधून ते बैलाच्या शिंगांना व इतर जनावरांच्या गळ्यांत वगैरे हौशीनें बांधतात. रंग, सफेती वगैरे देण्याकरितां या मुळ्यांचे कुंचे करितात. पळसाची पाने पावसाने लवकर कुजत नाहीत, म्हणून शेतकरी लोक या पानांनी विरलीं शाकारितात. पळसाच्या पानांचे द्रोण व पत्रावळी फारच चांगल्या होतात. द्रोण-पत्रावळींचा धंदा दिसण्यांत जरी अगदी शुल्क दिसतो, तरी तो बिनभांडवलाचा असून, पुष्कळ फायदेशीर आहे. सदर धंद्याला विशेष कौशल्यही लागत नाहीं. हात व दृष्टि ही दोन्ही शाबूत असून, उद्योग करून पैसा मिळविण्याची जर इच्छा असेल, तर कोणाही मनुष्यास बिन भांडवलाने या द्रोण-पत्रावळीच्या धंद्यावर शेकड़ों रुपये मिळविता येतील. गोमांतक, मालवण, वेंगुर्ले, सुरत वगैरे ठिकाणी पत्रावळींचे धंद्यावर शेकडों लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. पत्रावळी लावण्याला जरी विशेष कौशल्य लागत नाही, हे खरे आहे; तथापि कल्पक मनुष्य असल्यास त्यांतल्या त्यांत तो आपलें बुद्धिकौशल्य खर्च करून इतरांपेक्षां ज्यास्त नफा खात्रीनें