पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४      व्यापारोपयोगी वनस्पतिवर्णन.

-----

उपयोग होण्यासारखा आहे. बकुळीच्या लांकडांतील जुनाट नाराला उत्तम प्रकारचा सुगंध येतो. यामुळे कांहीं लोक या लाकडाचा चंदनाप्रमाणे, उपयोग करतात. बकुळीच्या खोडामध्ये सुगंध आहे, ही गोष्ट पुष्कळ लोकांना ठाऊक नसल्यामुळे ते त्याचा फायदा घेत नाहीत. तरी ज्या ठिकाणी ही झाडे पुष्कळ असतील, तेथील उद्योगी माणसाने ही खोडे कापून विक्रीकरितां बाजारांत ठेवल्यास बराच फायदा होईल. खोडाकरितां लाकूड कापणे तें जुनाट असावे. कारण कोवळ्या खोडाला चांगला वास येत नाही.

 आतां या झाडाचे औषधी उपयोग काय आहेत ते पाहूं. अतिसाराचा उपदुव झाला असतां बकुळीच्या बिया थंड पाण्यात उगाळून देतात. बकुळीच्या बिया व अळूच्या बिया पाण्यांत उगाळून दिल्या असतां, मोडशींचा विकार नाहीसा होतो. दांत घट्ट होण्याकरितां बकुळीच्या सालीच्या गुळण्या करितात किंवा सालीची भुकटी करून दांतांस चोळतात. पंजाबांत वांझपण जाण्याकरता बकुळाची साल बायकांस देतात असे म्हणतात. बकळीच्या वाळलेल्या फुलांचे चूर्ण करून ओढल्यास मस्तकशुळाचा विकार नाहीसा होतो. असे या झाडाचे आणखीही कांहीं औषधि उपयोग आहेत.

--------------------
३६ हिरडा.

  हिरड्याची झाडे मालवण, राजापुर, गुजराथ व घाटमाथ्यावरील मावळप्रांत येथील जंगलांत आपोआप होतात. ही झाडे बरीच मोठी वाढतात. याचे लाकूड मजबुत असल्यामुळे लहान सहान घरांना या लांकडाचा उपयोग हातो. हिरड्यास संस्कृतांत हरीतकी असे नांव आहे. जो हिरडा कठीण, लवकर न तुटणारा, जाड, लांबट, टोकदार, पाण्यांत बुडणारा आणि दोन किंवा दोहोंहून ज्यास्त तोळे वजनाचा असतो; त्यास सुरवारी हिरडा अस म्हणतात. तो फार गुणकारी आहे. कोवळे हिरडे काढून वाळवितात, त्यास ' बाळ हिरडे' व साधारण इतर हिरड्यांस जंगली हिरडे म्हणतात. "नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी" या वचनावरून वैद्यकशास्त्रांत हिरडयाची योग्यता किती आहे, याची वाचकांना बरोबर कल्पना होईल. हिंद वैद्यकशास्त्रकारांनी हरीतकांचे १ अभया २ चेतकी ३ पथ्या ४ पूतना ५ हरीतकी ६ जया आणि ७ हेमवती असे एकंदर सात प्रकार सांगितले आहेत. त्यांत अभया ही वाटोळी अंगुळभर लांब व पाच रेषांनी युक्त अशी असते. चेतकी ही सात अंगुळे लांब असून ऊध्वरेषायुक्त असते व ही हातांत धरल्यानंही रेच होतात. पथ्या हा पांच अंगुळे लांब व पांच रेषांनी युक्त अशी असते. ही कृमिनाशक आहे. पूतना