या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५ वे ].     स्कंद अगर खोड Stem.     २५
-----

वाढून त्यांच्या पुढे फांद्या बनतात. प्रत्येक पानाचे पोटी एकच कळी पाहिजे असा नियम नाहीं. कधी कधी एकापेक्षा जास्त कळ्या आढळतात व त्यामुळे अधिक फांद्या एका जागी तयार होतात. खरोखर फांद्या म्हणजे बुंध्यावरील सादृश उपांगें होत. ज्याअर्थी फांद्या पानांचे पोट असणाऱ्या कळ्यापासून वाढतात, त्याअर्थी पानांचा व फांद्यांचा पुष्कळ निकट संबंध असतो. ज्याप्रकारची पानाची मांडणी त्याप्रकारची फांद्यांचीही मांडणी आढळते.

 फांदीची व्यवस्थाः —क्षुद्र वनस्पतीमध्ये व उच्च वनस्पतीमध्ये फांद्याची व्यवस्था निरनिराळ्या प्रकारची आढळते. क्षुद्र वनस्पतीमध्ये फांद्यांची व्यवस्था ' द्विपाद ' (Dichotomous) असते म्हणजे अग्रावरीळ कळी द्विधा होऊन त्यापासून सारख्या दोन फांद्या तयार होतात व प्रत्येक तयार झालेल्या फांदीपासून पुनः पूर्ववत् दोन फांद्या बनतात. कधी कधी तयार होणाऱ्या दोन फांद्या पैकी एकच वाढते व दुसरीची वाढ खुंटून जाते. त्याजागी फांदी असल्याबद्दल एखादी खूण मात्र राहते. फांदीच्या वाढीची दिशा उजवीकडून डावीकडे असते. एका ठिकाणी दोन्हीचे मिश्रण सहसा कधी होत नाहीं.

 एकपादः-Monopodial उच्च वनस्पतींच्या फांद्यांची व्यवस्था ' एकपाद' Monopodial असते. ह्या व्यवस्थेचे मुख्य दोन पोटभेद आहेत. (१) अनियमित ( Racemose ) (२) नियमित. १ अनियमितः--येथे फांद्याची वाढ नेहमी बुंध्यावर सारखी होत असते. सर्वात लहान फांदी शेवटी अग्राकडे असून जुनी फांदी बुडाकडे असते. मुख्य खोड सर्व फांद्यांपेक्षा मोठा असतो. जसे सुरू, बकाणा, वेळू इत्यादि मुख्य वाढणारा कोब सारखा अग्राकडे वाढत राहून त्याचे नियमन होत नाही. म्हणूनच अशा व्यवस्थेस अनियमित व्यवस्था हे नांव पडले आहे. एकदलधान्य वनस्पतींत विशेषेकरून फांद्या मोठ्या वाढत नाहींत, पण त्यांमध्ये फांद्यांची व्यवस्था अनियमित असते. द्विदलधान्य-बनस्पतीमध्ये दोन्ही नियमित अथवा नियमित व्यवस्था आढळतात. ३ नियमित फांद्यांची व्यवस्था:-(Definite or Cymose) येथे खोडाच्या वाढत्या कोंबाची वाढ प्रथम खुंटते व बाजूकडे नवीन कळ्यापासून निराळ्या फांद्या तयार होतात. मुख्य खोडाची लांबी इतर फांद्यांपेक्षा कमी असते. नियमित व्यवस्थेमध्येसुद्धा दोन पोटभेद करितां येतात. विंचू नांवाच्या वनस्पतीस दोन