पान:वनस्पतीविचार.djvu/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ वनस्पतिविचार, [प्रकरण wwwwww प्रकरण ९वें. त. उमावरून त्याची उल असतो. मुळावतात. हे कस सूमा बाह्यत्वचे अंतररचना. मुळ्याः -पूर्वीप्रमाणे पावटा लांकडाचे भुसांत पेरून त्यावर पाण्याचा हबका द्यावा, व न वाळेल अशी व्यवस्था करावी. काही दिवसांनी वाढता कोंब, दोन डाळिंबी, आदिमूळ व त्यावरील द्वितीयक अगर त्रितीयक मुळ्यांच्या शाखा, तसेंच पाने वगैरे क्रमाक्रमाने दिसू लागतील. खोड, पाने वगैरेंची विशेष विचक्षणा न करितां तूर्त आपले लक्ष्य केवळ मुळे व उपमुळे इकडेच देऊ. मुख्य मूळ भुसांत लांबवर गेले असून त्यावर उपमुळे वरून खाली फुटत जातात. उपमूळ जोराने उपटले असता मुळावर त्याजागी खोल भोक पडलेले आढळेल. ह्यावरून त्याची उत्पत्ति मुख्य मुळाच्या केवळ बाह्यत्वचेपासून होत नाही. त्याचा उगम आंत खोल असतो. मुळांवर तसेंच उपमुळ्यांवर बारिक बारिक केंस अग्राकडील भागाजवळ दृष्टीस पडतात. हे केस सूक्ष्मयंत्रांत तपासिलें असतां ते एकपेशीमय आहेत असे आढळेल. केसांचा उगम बाह्यत्वचेपासून होतो. त्यांचा वनस्पति जीवनक्रमांत फार मोठा उपयोग असतो. हा उपयोगं वनस्पतीच्या पोषणक्रियेत फारच महत्त्वाचा असतो, जमिनीतून द्रव स्थितीत अन्नद्रव्ये शोषून घेणे हे काम ह्या केसाद्वारे घडत असते. केसांतील जीवनकण शोषणकार्याकरितां फार तत्पर असतात. साध्या पेशीप्रमाणे, केसांत केंद्र, सजीवतत्व, पेशद्रिव्ये, जडस्थाने, पेशीरस वगैरे आढळतात. केसांचा संबंध जमिनीच्या खरखरीत भागाशी नेहमी येत असल्यामुळे ते वरचेवर झडून जातात. पण त्याबरोबरच नवीन केंस उत्पन्न होत असतात. हरितवर्ण शरीरें (Chloroplasts) केसांत आढळत नाहीत. येणेप्रमाणे केंसाचें परीक्षण झाल्यावर मुख्य मुळ्या पाहण्यास सुरुवात करावी. अयाजवळ वस्त्रयाने माडवा पातळ छेद घेऊन कांच पट्टीवर ठेवून पूर्वीप्रमाणे सूक्ष्मदर्शकयंत्रांतून दर्शक पाहण्याकरितां तो तयार करावा. सूक्ष्मयंत्रांत हा भाग पाहताक्षणी असें दिसेल की, तो भाग निरनिराळ्या आकाराच्या पेशींचा बनलेला आहे. या निरनिराळ्या थरांतील पेशी आपण बाहेरून क्रमाने आंत पाहूं.