पान:वनस्पतीविचार.djvu/115

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० वें]. ____ कर्तव्ये. परिवर्तुळ वगैरे स्पष्ट असतात, तसेंच ग्रंथीमध्ये काष्ठ व तंतुकाष्ठ पदरामध्ये संवर्धक पदर ( Combium) असतो. उपपुष्पपत्रांची रचना ( Bracts) बहुतेक साध्या पानासारखी असते. पुष्पावरणे, हरित किंवा पीतदलें हीसुद्धा एकप्रकारची पाने होत. त्यांची रचनाही मूलतत्त्वांत पानाप्रमाणे असते; ते भाग नाजूक असल्यामुळे काही बाबतीत फरक पडत जाणारच. शिवाय त्यांचे काम वेगळे असल्यामुळे निर.. निराळी रंजित शरीरे त्यांच्या समपरिमाण पेशीत आढळतात. प्रकरण १० वें. कर्तव्ये. वनस्पतीची मुख्य अंगें चार असून, प्रत्येकास काही विशिष्ट काम करावें लागते. ही अंगें म्हणजे मुळ्या, खोड, पाने व फुलें होत. ही सर्व अवयवें उच्च वर्गीय वनस्पतीमध्ये आढळतात, ही गोष्ट खरी; पण क्षुद्र वर्गीय वनस्पतींत ही सर्व सांपडणे कठीण असते. शिवाय क्षुद्रवर्गात काही वनस्पति तर एकपेशीमय असतात. अशा ठिकाणी त्या एका पेशीसच सर्व कामे करणे भाग पडते. एक पेशीमय वनस्पति साधी असून त्यांत संकीर्णता अगदी नसते. जशी जशी अधिक संकीर्णता वनस्पतिशरीरांत उत्पन्न होत जाते, त्याप्रमाणे उच्चवर्गीय होऊ लागते. म्हणूनच शरीराच्या कमी अधिक संकीणतेप्रमाणे वनस्पतीस निरनिराळी अवयवें उत्पन्न होऊन ती क्षुद्र अथवा उच्च वर्गीय बनत जातात. अमुक एक वनस्पति उच्च वर्गीय आहे अथवा क्षुद्रवर्गीय आहे, हे ठरविणे तिच्या अवयवसंकीर्णतेवर पुष्कळ अंशी अवलंबून असते. संकीर्णतेबरोबर श्रमविभागत्व जास्त जास्त दृग्गोचर होत असते. जेथे संकीर्णता नाही, तेथे श्रमविभागही नाही, हा सर्वसामान्य सिद्धांत वनस्पतिचरित्रांत नेहमी पाहण्यास सांपडतो. उच्च वर्गामध्ये निरनिराळी अवयवे असल्यामुळे व प्रत्येक अवयवांकडून निराळे काम घडत गेल्यामुळे, श्रमविभागत्व पूर्णपणे दृष्टोत्पत्तीस येते. यावरून ज्या ज्या ठिकाणी कामासंबंधी अधिकाधिक वाटणी आढळते, त्या त्या वनस्पतीस उच्च वर्गाची समजणे गैरवाजवी होणार नाही.