________________
११]. ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure). ९१ wwmom प्रकरण ११ वें. ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति. (Root pressure) शोषणक्रियाः-प्रथम मुळ्या जमिनीतून अन्न कसे जमा करितात व पुढे तें कसें खोडांत पोहोचविले जाते, ह्याचा विचार करूं. ___मुळे जमिनीत घुसल्यावर त्यांस निरनिराळ्या फांद्या येऊन, अग्राजवळ प्रत्येक फांदीवर अथवा आदिमूळावर बारीक बारीक एकपेशीमय केस येतात, हे केस अन्न शोषून घेण्याचे कामांत वनस्पतीस उपयागी पडतात. सजीव तत्त्व, केंद्र व इतर पेशीद्रव्ये ह्या केसांच्या पेशीत नेहमी आढळतात. जेव्हा यांचा मातीशी संबंध येतो, त्या वेळेस दोहोंमध्ये ऑसमॉसिस क्रिया अथवा शोषणक्रिया सुरू होते. जमिनीत पाणी असून त्यामध्ये निरिंद्रिय द्रव्ये विरघळतात. केसांतील जीवन कणांची शोषकक्रिया जास्त असल्यामुळे बाहेरील द्रव्यमिश्रित पाणी पेशीभित्तिकेमधून आंत शिरते. पाणी शिरल्यानंतर जीवनकण पातळ होऊ लागतात, पण पुढे लवकरच ह्या द्रव्याकरिता वेगळी जडस्थानें उत्पन्न होऊन त्यांत ती सांठविली जातात. जीवनकण भित्तिकेजवळ राहिल्याने एकदां शोषण केलेली द्रव्ये बाहेर जाऊ शकत नाहीत. शुद्ध पाणी वाटल्यास बाहेर जाते. शुद्ध पाण्यास अटकाव नसतो. केसांत एक प्रकारचे आम्ल असून ते ऑस्मासिस क्रिया सुरू झाल्यावर थोडे बाहेर येतें व जमिनीतील पाण्याशी मिसळतें. बाहेर आलेल्या आम्लाचा उपयोग सुद्धा वनस्पति चरित्रांत होत असतो. कारण जमिनीत साध्या पाण्यांत न विरघळणारी पुष्कळ द्रव्ये असून, विरघळल्याशिवाय पेशीभित्तिकेंत ती शिरणे फार कठीण असते; म्हणून वनस्पति कांही तजवीज न करील तर त्यांचा पोषणास उपयोगही होणार नाही. मग अशी द्रव्ये जमिनीत असून नसून वनस्पतीस काय उपयोग? पण ईश्वरी नियम असा आहे की, ही द्रव्ये वायां न जाऊं देतां वनस्पतीस उपयोगी पडावीत म्हणून त्याकरितां तजवीजसुद्धा केली असते. असल्याने विरघळणा-या द्रव्यास विरघळून सोडणे हा त्या बाहेर येणान्या आम्लाचा उपयोग असतो. खरोखर हा उपयोग मोठा महत्त्वाचा