________________
११वें]. ऑस्मासिस् क्रिया व मूलजनित शक्ति (Root pressure). ९५ अग्रांतून देवासारखे बिंदू पानाच्या पृष्ठभागांवर चमकू लागतात. पानांतील पेशीत फाजील पाणी भरल्यामुळे कधी कधी बाह्यत्वचा फाटून बाहेर पाणी गळू लागते. उन्हाळ्यांत असले प्रकार फारसे आढळत नाहीत. पानांतून अशा रीतीने पाणी वाहणे म्हणजे खरोखर वनस्पतीचे एक प्रकारे नुकसान होते. कारण ह्या पाण्यांत पुष्कळ उपयोगी पडणारी पौष्टिक द्रव्ये असतात. अशा पाण्याचे रसायन-शास्त्र-पद्धतीने पृथक्करण केले असतां किती तोटा होतो, हे • सहज कळणार आहे. ही निरिंद्रिय द्रव्ये अशा रीतीने बाहेर न जाती तर त्यांचा उपयोग वनस्पति-आयुण्यक्रमांत होऊन त्यांपासून पोषणकार्य घडले असते. तसेच त्याचा परिणाम वनस्पतीच्या आरोग्यावरही झाला असता. बाष्पीभवन होत नसतांना ह्या शक्तीचा जोर मोजितां येतो. वसंत ऋतूच्या सुरवातीस पाने ही पूर्ण आली नसतां द्राक्षाचा खोड आडवा कापून टाकावा. या कापिलेल्या भागांतून पाण्याचा प्रवाह बाहेर पडूं लागेल. हा प्रवाह मूल जनितशक्ति-परंपरेनें सारखा वाहत राहतो. द्राक्षाच्या खोडांतच हा चमत्कार दिसतो असें नाही. इतर पुष्कळ वनस्पतीमर्थे ह्या प्रकारचा चमत्कार दिसून येईल. लिंबाच्या खोडांतून कधी कधी अशाच प्रकारचा रस आपोआप गळत असतो. हा रस सुद्धां मूलजनित शक्तीचा एक प्रकार आहे. ___ मुळांचा जोर इतका असेल व त्यापासून असें कार्य घडत असेल, असें जोंपर्यंत पूर्णपणे माहीत नव्हते, त्यावेळेस मुळावरील केसांत पाणी शिरणे तसेच ते पाणी वर चढणे ही कार्य केशाकर्षक ( Capillary) असावीत, असा समज होता. तेलामध्ये वात बुडवून ठेविली असतां, आपोआप हळू हळू वातीच्या अग्रांकडे तेल येत जाते. हा नैसर्गिक चमत्कार नेहमी पाहण्यांत असतो. तहतूच तो चमत्कार वनस्पतिमुळांत पाणी शिरण्यासंबंधी असावा, असा पूर्वीचा समज होता. सूक्ष्म मुळ्या अथवा मुळावरील केस, ही जमिनीतील पाण्यात बुडाली असून, जसें तेल वातीतून वर चढते, त्याप्रमाणेच पाणी त्या केसांतून आपोआप वर चढते. तसेच पाण्याच्या कमी अधिक घनतेप्रमाणे पाणी वर चढत असावे असा नेहमी कोटिक्रम करण्यांत येत असे. कारण जितकें तेल पातळ असते, तितकें तें लवकर वातीत शिरून वर येते, तसेंच जितकें तें धन व घट्ट असते, त्या मानानें तें सावकाश चढत जाते.