पान:वनस्पतीविचार.djvu/137

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें.] क्षार, कार्बन्वायु व हरित्वर्ण शरीरें. १०९ मुळे सूर्यप्रकाशांत कार्बन वायु शोषिला जाऊन सेंद्रिय पदार्थ तयार होणार नाहीत व शेवटी ती वनस्पति फिक्कट होऊन आपोआप मरून जाईल. । सोडियम, मँगेनीझ, आयोडीन वगैरे वस्तु जरी वनस्पतीस आवश्यक नाहीत, तरी त्या पुष्कळ वेळां वनस्पतिशरीरांत सांपडतात. तांबें, जस्त, निकेल, अॅल्युमिनियम वगैरे धातुसुद्धां वनस्पतीमध्ये आढळतात. ह्यांचे प्रमाण किंवा अस्तित्व ज्या जमिनीत ती उगवते, तिच्या घटकावयवांवर अवलंबून असते. हे पदार्थ ऑसमॉसिस क्रियेनें मुळांवरील केसांतून वनस्पतींत जातात. आतां असा प्रश्न उद्भवतो की, ज्या वस्तूंची वनस्पतीस जरूरी नाही. त्या वस्तु प्रथमपासुनच कां शोषिल्या जातात? सजीवतत्त्व आपली पसंती अथवा नापसंती, पदार्थशोषणाचे वेळी कां उपयोगांत आणीत नाही ? खरोखर ऑसमॉसिस क्रियेनें जे पदार्थ शरीरांत शोषिले जातात, त्यांवर सजीवतत्त्व प्रथम अम्मल करीत नसते; पण पदार्थ शोषिल्यावर त्यांमध्ये जरूरीचे कोणते व निरुपयोगी कोणते ह्याची विचक्षणा होऊन जरूर नसलेल्या पदार्थास दूर एका जागी नेऊन ठेवण्याची व्यवस्था मात्र तें करिते. ही व्यवस्था करण्यांत सजीवतत्त्व आपली पसंती दर्शविते. शिवाय ऑसमॉसिस क्रिया सुरू होण्याचे वेळेस असल्या पदार्थाचा दुस-या पदार्थाशी अतिनिकट संयोग असल्यामुळे दुस-या पदार्थीबरोबर तेही शोषिले जातात. त्याप्रमाणे ऑसमॉसिस क्रिया दोन भिन्न घनतेच्या द्रवांमध्ये सृष्टिनियमाने सुरू होते; पण पाणी केसांत शिरल्यावर आंतील सजीवतत्त्व पाण्यामुळे उत्तजित होऊन पुढे आलेल्या पदार्थात जीवनकार्यास उपयोगी पडणारे कोणतें व निरुपयोगी कोणतें, हे सर्व पाहून तजवीज करिते. म्हणून ऑसमासिस क्रिया सुरू होण्यापूर्वी सजीवतत्त्वास पसंती अगर नापसंती दाखवितां येत नाहीं; येवढेच ह्यासंबंधाने तूर्त उत्तर देता येते. याविषयी पूर्ण ज्ञान नाही हे कबूल करणे भाग आहे. फॉस्फरस व गंधक ह्या दोन वस्तु सजीवतत्त्वाच्या घटकावयवांत आढळतात. ह्याही वस्तु आवश्यक आहेत. सजीव पदार्थात गंधक असते. फॉस्फरस केवळ केंद्रबिंदूमध्ये (Nucleius) असतो.. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन व नायटोजन तसेंच गंधक व फॉस्फरस हे पदार्थ एकमेकांशी मिसळून सजीव पदार्थ तयार होतात. सात्त्विक सेंद्रिय पदार्थ पहिल्या तिन्हींचेच बनतात.