पान:वनस्पतीविचार.djvu/141

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ वें]. क्षार, कार्बन्वायु व हरित्वर्ण शरीरें. ११३ अथवा अमूक एका विशिष्ट अवयवाची जरूरी नसते. ही गोष्ट खरी की, पानांमध्ये सात्त्विक सेंद्रिय पदार्थाप्रमाणे नायट्रोजनयुक्त पदार्थ अधिक तयार होतात. क्षुद्र वर्गापैकी आळंब्या ( Fungoid plants ) सुद्धा नायट्रो. जन सेंद्रिय पदार्थ तयार करितात. त्यांमध्ये हरितवर्ण शरीरें असत नाहीत. ह्यावरून हरित्वर्ण शरीरांची ते तयार करण्यास आवश्यकता नसते. कांहीं वनस्पतींमध्ये हे नायट्रोजनयुक्त सेंद्रिय पदार्थ प्रकाशामुळे अधिक तयार होतात असें ठरत आहे, पण त्यावरून प्रकाशाची जरूरीच आहे, असा साधारण नियम कान्तिां येणार नाही. अजून ह्यासंबंधी अधिक प्रयोग झाले पाहिजेत. हरितवर्ण शरीरें सूर्यप्रकाशाकडे वळलेली असून त्यांमधील सजीव तत्त्व आपणांस योग्य प्रकाश पाहिजे तितका घेण्याची व्यवस्था करिते. जेव्हां सूर्यप्रकाश मंद असतो, अशा वेळेस अधिक हरितरंजक कण उघडे राहून सूर्यप्रकाशाचा पूर्ण फायदा घेतात. पानाचे पूर्ण पत्र सूर्यप्रकाशाकडे वळतें खरे, पण ज्या वेळेस सूर्यप्रकाश अति कडक असतो, त्यावेळेस हरितवर्ण कण किनाऱ्याकडे वेगवेगळे न राहतां आतील बाजूस जाऊन, त्यांचे पुंजके बनतात. अशा रीतीने सजीव तत्त्व, प्रकाशाचा कडकपणा हरित वर्ण शरीरांवर होऊ न देतां आपलें इच्छित कार्य करून देते. कडक उन्हांत पानाची पत्रे पूर्ण उघडी न राहतां वळविलेली असतात. ह्याचे कारण सर्व भाग सूर्यप्रकाशाकडे उघडा असण्याची जरूरी नसून जितके सूर्यकिरण पाहिजे असतील, तितके पानांवर पडण्याची तजवीज सजीव तत्त्व करीत असते. हरितवर्ण कणाचे पुंजके बनविणे अथवा त्यांच्या वेगळ्या सारख्या रांगा तयार करणे वगैरे, कमी अधिक प्रकाशाच्या कडकपणावर अवलंबून असते. आतां आपण सूर्यकिरण जेव्हां पानावर पडते त्या वेळेस त्याची काय स्थिति होते हे पाहूं. सूर्यकिरण पानांवर पडल्याबरोबर परावर्तन* होऊन त्याचे निर

  • पावसाळ्यांत आकाशांत इंद्रधनुष्य जेव्हां दृष्टीस पडते, त्या वेळेस त्याचे निरनिराळे रंग फारच मजेदार दिसतात. हे इंद्रधनुष्यांत दिसणारे निरनिराळे रंग सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे उत्पन्न होतात. प्रकाशाचा प्रत्येक किरण परावर्तन पावल्यास असले रंग उत्पन्न होतात. परावर्तनास योग्य जागा असली म्हणजे, हे रंग आपोआप दिसू लागततात. प्रकाशासंबंधी कल्पना अशी आहे