________________
१४ वें]. शोषणाच्या अन्य रीति व श्वासोच्छ्वासक्रिया. ११९ rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr. ... फांद्यांचे, खोडांचे अथवा मुळांचे वाढते कोंब ह्यांस सेंद्रिय द्रव्याची विशेष जरूरी असते. त्याचप्रमाणे कांहीं पेशी जीर्ण होऊन नवीन वाढण्याचा जेथें संभव असतो, त्या ठिकाणी संघटनात्मक द्रव्याची आवश्यकता असते. अथवा संरक्षक केस, पापुद्रे वगैरे जेव्हा वनस्पतीस पाहिजे असतात, तेव्हां त्यांची पूर्तता करण्यास सेंद्रिय पदार्थ त्या जागी पाठवून तजवीज करणे भाग असते, तसेंच कीटक, मधमाशा वगैरे प्राण्यांस फसवून त्यांपासून कार्य करून घेण्याकरितां काही विशिष्ट अवयवांत मधुर रस अथवा त्याप्रकारचे दुसरे रस सांठविणे जरूर असते. ह्या रसाचा उगम सुरू राखण्याकरितां तयार केलेले सेंद्रिय पदार्थ खचिले जातात. असल्या विशिष्ट अवयवांकडे सेंद्रिय द्रव्याची बोळवणी करणे अवश्य असते. त्याच रीतीने मांसाहारी वनस्पतीमध्ये व्यक्तिमात्र विशिष्ट रचना व विशिष्ट रस-उत्पादनाची जरूरी असल्यामुळे अशा ठिकाणी सेंद्रिय द्रव्ये पाठविल्याशिवाय कसें भागेल ? हवेच्या फरकामुळे सेंद्रिय द्रव्ये तयार करण्याची शक्ति वनस्पतिशरीरांत कमी अधिक होत असते. अशा कारणाकरितां दूरदर्शीपणाने जागजागी शिल्लक राखून ठेविली पाहिजे. बीजें ही पुढील रोपडी होत. त्यांच्या जननस्थितीस उपयोगी पडावीत म्हणून त्यांमध्ये काही द्रव्ये सांठविणे जरूर आहे. इतक्या सगळ्या गोष्टी संभाळून वनस्पति आपले शरीरसंवर्धन करिते. जागजागी नुकसान व अपघात प्राण्यादिकांपासून वनस्पतीस सोसावे लागतात. ते नुकसान भरून काढण्याकरितां अथवा ते मुळापासूनच न होऊ देण्याकरितां निरनिराळया सोई प्रसंगविशेषीं वनस्पतीस कराव्या लागतात. अशा गोष्टीस सेंद्रिय द्रव्ये लागतात. हा खर्च सांठविलेल्या द्रव्यांतून करावा लागतो. वंशवर्धन करणे व तत्संबंधी अवयवांची जोपासना व वृद्धि करणे, ही सर्व वनस्पतिजीवनक्रमांत मोठी महत्त्वाची असतात. ऋतुकाली रोजच्या रोज तयार झालेल्या असल्या द्रव्यांपैकी बहुतेक भाग ह्यांकडे पाठविला जातो. . सेंद्रिय रसमार्ग-पानाच्या रचनेत वरील व खालील बाजू मिन्न रचनेच्या असतात. वरील बाज गजासारख्या पेशींची असून खालील बाज स्पंजासारख्या पेशींची असते. दोन्हींचा संबंध मध्यभागाचे सुमारास असतो. अव्यवस्थित पेशींचा एक भाग वरील पेशीशी संबंध पावून, दुसऱ्या भागांचा संबंध पानांतील रज्जूशी असतो. तयार झालेले सेंद्रिय पदार्थ वरून अव्यव