________________
wwwwwwwwwwwwwwww wwww १४ वें]. शोषणाच्या अन्य रीति व श्वासोछ्वासक्रिया. १२३ wwwwwwwwwmarature दुसऱ्याने त्या उत्पन्नाचा खर्च करून ते उत्पन्न येत राहील अशी तजवीज करावी. शिवाय ट्रॅफिक खाते सुरू होण्यापूर्वी लोकोखाते अस्तित्वात येते. ते कायम राखणे ट्रॅफिक खात्याच्या उत्पन्नावर अवलंबून असते. हा दृष्टांत वनस्पतिशरिरांत असणा-या खात्यास लागू पडतो. एका खात्याकडून सेंद्रिय पदार्थ उत्पन्न करावेत, व दुस-याकडून ते पदार्थ खर्चुन पुनः सेंद्रिय पदार्थ उत्पन्न करण्याची शक्ति व साधने पहिल्या खात्यास द्यावी, असा परस्पर संबंध असतो. जमा असल्याशिवाय खर्च नाही व खर्चाशिवाय जमेस महत्त्व नाही. खर्च होऊन जी शिल्लक राहते, ती शरीरपुष्टीकडे उपयोगी पडते. __ श्वासोच्छ्वासक्रियेत हवेतून शुद्ध आक्सिजनवायु शोषिला जाऊन बाहेर कार्बन आम्लवायु सोडिला जातो. पूर्वीच्या कार्बन संस्थापनेंत कार्बनवायु शोषिला जाऊन त्याचे विघटीकरण होऊन त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनल्यावर उलट आक्सिजन वायु सोडिला जातो. ह्या दोन्ही क्रिया परस्पर विरुद्ध आहेत. दिवसाउजेडी कार्यन संस्थापन किया जोराने चालत असल्यामुळे श्वासोच्छ्वास क्रिया स्पष्ट समजली जात नाही; पण रात्री कार्बन संस्थापन बंद असल्यामुळे श्वासोच्छ्वास क्रिया स्पष्ट कळते. लहान रोपड्यावर चोहों बाजूंकडून एखादे कांचेचे झाकण घालून बाहेरून आंत नवीन हवा न येईल अशी व्यवस्था करावी. नंतर त्या रोपड्यास श्वासोच्छ्वास क्रियेस शुद्ध आक्सिजन वायु न मिळाल्यामुळे ती क्रिया बंद पडून तो रोपा मरून जातो. मागाहून पुनः शुद्ध हवेत तो रोपा ठेविला तर तो जगत नाही. शुद्ध हवा वनस्पतीस अगर प्राण्यास नेहमी अवश्य पाहिजे. जर ही हवा कमी मिळत जाईल, तर त्याचा परिणाम त्यांच्या शरीरप्रकृतीवर ताबडतोब होईल. इंजिनमध्ये असणारी लांकडे जळून ज्याप्रमाणे इंजिनाकडूत काम होत असते, तद्वतच वनस्पतिशरीरांतील सेंद्रिय पदार्थ जळून त्यांपासून मोठे कार्य होत असते. श्वासोच्छ्वास क्रिया म्हणजे सेंद्रिय पदार्थ जळणे होय, व त्यामुळे प्राणिवर्गाप्रमाणेच वनस्पतिशरीरांत एक प्रकारची कायम उष्णता आढळते. निरनिराळ्या वनस्पतींची श्वासोच्छ्वास क्रिया कमी अधिक जोराची असते. ज्यांमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहेत, त्या पदार्थात श्वासोच्छ्वासक्रिया कमी वेळ चालते. कारण ते सेंद्रिय पदार्थ एकदां श्वासोच्छ्वास क्रियेमुळे जळून