पान:वनस्पतीविचार.djvu/155

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

aamanarmananaraaaaaaaaaaaaaare १५ वें]. पचन, वाढ व परिस्थिति. १२७rrrrrrrrrrrrrrrrrrror ह्याच प्रकारचा पडदा अन्न व गर्भ यांचे दरम्यान आढळतो. ह्या पडद्यांत पुष्कळ पाचक पिंड असतात. जेव्हां बीजास सर्द हवा मिळते त्यावेळेस आंतील गुप्त सजीवतत्त्व जागृत होऊन अन्न पोषण करण्यास सुरवात होते. गर्भाबाहरेलि अन्न ह्या पाचक पिंडाकडून गर्भात शोषिले जाऊन गर्भ वाढू लागतो, ब हळूहळू अंकुर बाहेर पडतात; म्हणजे उगवत्या गर्भास पडद्यामध्ये असणान्या पाचक पिंडाकडून बाहेरील अन्न उपयोगास मिळते. पचन केलेल्या अन्नापासून जीवनकण कसे तयार होतात अथवा कसें शरीरवर्धन होते, ह्यासंबंधी अजून अज्ञान आहे. वनस्पतीच्या वाढत्या कोंबाची बारीक तपासणी जरी केली तरी, त्यासंबंधानें कांही पत्ता लागत नाही. कारण वाढत्या कोंबांत जीवनकण अथवा खरी वाढ असते. वनस्पतीशरीरांत असणारी साखर कशी व कोठे जाते, तसेच नायट्रोजनयुक्त पदार्थ किंवा अमिडो असिड्स कोणते मार्गाने जाऊन त्यांचे पर्यवसान जीवनकण तयार होण्यांत कसें होते, ह्याविषयी अजून काही कळलें नाही. हे एक खरोखर मोठे गूढ आहे. प्राणिवर्गातील अन्नासंबंधानें ज्याप्रमाणे अभ्यास व शोध झाले आहेत, त्याप्रकारचे प्रयोग अजून वनस्पति अन्नासंबंधाने झाले नाहीत. वस्तु आंबणे:-पाचकरस अथवा पाचकरसोत्पादक पिंड नसून काही वेळां पाचक रसासारखें कार्य दृष्टीस पडते. हे कार्य पुष्कळ अंशी श्वासोच्छ्वास क्रियेसारखे असते. साखरेचा पाक काही दिवस उघडा राहूं दिला असता, त्यांत किण्ववनस्पति ( Yeast ) उत्पन्न होऊन साखरेस घाण येऊ लागते. ती किण्ववनस्पति साखरेसारख्या संकीर्ण पदार्थाचे विघटीकरण करून ऑक्सिजन वाय भक्षण करिते. पुढे त्यापासून कार्बन आम्ल व आलकोहल तयार होतात. इतर आम्लेही त्यांत उत्पन्न झाल्यामुळे त्या पाकास घाण येत असते. विशेष. करून आळंबी जातीच्या क्षुद्रवनस्पति असली नासाडी करूं शकतात. खरोखर ह्याठिकाणी किण्ववनस्पतीने हर्वेतून ऑक्सिजन शुद्ध वायु न शोषण करितां, साखरेच्या घटकावयवांतून तो वेगळा करून भक्षण केला, ह्यामुळे साखरेचें संकीर्णत्व नाहीसे होऊन त्यापासून कार्बन आग्ल गैरे वस्तू त्यांत उत्पन्न झाल्या. असल्या प्रकारास साधारण नांव ' वस्तू आंबणे' असें प्रचारांत आहे. तेव्हां ' वस्तु आंबणे, ( Fermentation ) किंवा श्वासोच्छ्वास क्रिया सुरु