________________
wwwwwwwwwwww १४० ... वनस्पतिविचार.. [प्रकरण waamwww wwwwwwwwwwwwmmmmmmmm स्पर्शाच्या उत्तेजनामुळे होते. वेल चढतांना प्रथम एका बाजूस स्पर्श होतो व त्यामुळे वनस्पतीस उत्तेजन मिळून दुसरे बाजूस त्याचे प्रत्युत्तर मिळतें. याप्रमाणे वळसे घालीत ते वर चढतात. विशेषेकरून सूत्रे ( Teudril ) असल्या उत्तेजनास प्रत्युत्तर देतात. परंतु सूत्रावर पावसाचे थेंब पडले असता किंवा त्यांचा परस्पर स्पर्श झाला असतां, उत्तेजनगीत दिसत नाही. वेलसूत्रांचे साहाय्याने वर चढतो, किंवा त्याचे अभावी ते स्वतः वळसे घेत वर चढतात. खोडाचे वळसे घेत वर चढणे म्हणजे स्पर्शजन्य प्रत्युत्तर चमत्काराचे दिग्दर्शन होय. अमरवेल वळसे घेत वर चढतो, पण आपले शरीरांतून जागजागी मुळ्या सोडून दुसऱ्या झाडाच्या शरीरांत घुसवितो. अमरवेलाच्या खोडाचा स्पर्श दुसरे खोडांशी होऊन केवळ वळसे घेण्यांत उत्तेजित प्रतिक्रिया संपते असे नाही, तर त्याच्या खोडांतील पेशी जागृत होऊन मुळ्या उत्पन्न होतात. तेव्हां अशा ठिकाणी मुळ्या निघणे हाही उत्तेजनास प्रत्युत्तर प्रकार होय. - जमिनीत मुळे उगवतांना पाण्याचा परिणाम मुळांवर होतो. जेथे पाणी असेल तिकडे मुळ्या नेहमी वळतात. पाण्यामध्ये जणूं आकर्षणशक्ति असून ती मुळ्यांना ओढीत असते. अशा वेळेस मुळ्यांवर दोन शक्तींचा जोर असतो. एक गुरुत्वाकर्षणशक्ति व दुसरी पाण्याची शक्ति; प्रथम मुळे गुरुत्वाकर्षण शक्तीस मान देतात, पण जरा जमिनीत गेल्यावर ती पाण्याचे जागी वळू लागतात. कोवळ्या मुळांवर हा परिणाम लवकर होतो. आळंब्याचे तंतु पाणी शोधीत जातात. शिवाय त्यास हवेतून पाणी शोषण्याची शक्तिही असते. त्या तंतूंवरसुद्धा पाण्यामुळे उत्तेजित परिणाम होतो. खरोखर मुळाच्या अग्रास पाण्यापासून उत्तेजन मिळते; पण, अग्र प्रत्युत्तर न देतां अग्रामागे असलेला वाढता बिंदु प्रत्युत्तरादाखल वळू लागतो. वनस्पतीच्या अंतररसाच्या घटकावयवात फेरबदल झाला असतां जीवनकार्यांत फरक होतात, म्हणजे अंतररसांत फरक झाल्यामुळे जीवनकण उत्तेजित होऊन जीवनकार्यात फरक करून प्रत्युत्तरक्रिया करितात. तद्वतच बाह्य रासायनिक फरक झाले असतां ते उत्तेजित होतात. उच्च वर्गाच्या वनस्पतीपेक्षा क्षुद्रवर्गीय वनस्पति अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रिया जास्त दर्शवितात. एकपेशीमय वनस्पतीवर सुद्धा नेहमी ऑक्सिजनवायूचा परिणाम होतो. ऑक्सिजनवायूकडे ह्या वनस्पति जणू धांव घेतात. ऑक्सिजनवायूचे उत्तेजन पहा.