________________
वनस्पतिविचार. [प्रकरण amrammarwarmarwarrammmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm rolla) असे म्हणतात. पहिल्या वर्तुळांत साधारणपणे तीन, चार व पांच भाग असतात. प्रत्येक दलास हरितदल अथवा सांखळी ( Sepal ) अशी संज्ञा आहे. दुसऱ्या वर्तुळांतील भागास पीतदल अथवा पांकळी असें म्हणतात. तिसरें व चवथें वर्तुळ पुरुष व स्त्री-व्यंजक आहे. म्हणजे तिसरे वर्तुळ पुंकेसर-कोश ( Androcium ) व चवथें स्त्रीकेसर-कोश (Gynoecium ) अशी निरनिराळी नावे त्याच्या गुणधर्माप्रमाणे दिली आहेत. पुंकेसर-कोशांत निरनिराळे सुटे केसर असून त्यावर परागपिटिका असते. केसर म्हणजे पिटिकेचा दंड होय. पिटिकेस दोन किंवा चार कप्पे असून प्रत्येक कप्प्यांत परागकण असतात. प्रत्येक परागकणांत पुंस्तत्त्व असून त्यायोगाने गर्भधारणक्रिया साधिली जाते. स्त्रीकेसर कोशाचेही मुख्य तीन भाग असतात-१ अण्डाशय (Ovary) २ परागवाहिनी (Style) व त्यांवरील स्त्रीकेसराय (Stigma) स्त्रीकेसरदल ( Carpel ) अण्डाशयास आच्छादन करणारा पडदा होय. अण्डाशयामध्ये बीजाण्डे (Ovules) असतात. ह्याच कणापासून गर्भ-संस्थापना झाल्यावर बीज तयार होते. बीजाण्डांत पराग कणाप्रमाणे स्त्रीतत्त्व असून हे पराग-कणांतील पुरुषतत्त्वाशी संयोग पावून गर्भीकत होते, व त्याचा परिणाम म्हणजे बीजोत्पादन होय. स्त्रीकेसरदला ( Carpel ) च्या विशिष्ट भागास बीजाण्डे (Ovules ) चिकटलेली असतात. त्या भागास नाळ ( Placenta) म्हणतात. वाटाण्याची शेंग सोलून पाहिली असतां ज्या पांढऱ्या भागास दाणे चिकटलेले असतात त्यांसच नाळ म्हणतात. आतां कांहीं ठिकाणी दाण्यास नाळेपासून लहानसा देंठ येतो. स्त्रीकेसरदला ( Carpel) वरील परागवाहिनी नेहमी असते असे नाही. शिवाय इतर वर्तुळाप्रमाणे स्त्रोकेसरदलांची संख्या व्यक्तिमात्र फुलांप्रमाणे निरनिराळी असते. स्त्रीकेसरदले संयुक्त अथवा अलग राहतात. सर्वसाधारण फुलांत वरील प्रकारची व्यवस्था आढळते. पण आकस्मिक कारणांनी पुष्कळ फुलांत तसेच त्यांच्या वर्तुलदलांत कमी अधिक फरक झाला असतो. जवसाच्या फुलांत पांच साकच्या (Sepal) पांच पांकळ्या (Petal) पांच पुंकेसर (Stamen)व पांच स्त्रीकेसर-दल (Corpel) आढळतात. म्हणजे प्रत्येक वर्तुळांत दलें सारखी असून त्यांची संख्याही सारखी असते. अशी सारखी पूर्ण फुले फार थोडी असतात. कोणत्याही दलापासून अशा फुलात दोन सारखे