________________
१९ वें]. पुंकोश व स्त्रीकोश, पिटिकेत असलेली पिवळी भुकटी ही परागधूली होय. ह्या भुकटीचे शेकडों कण प्रत्येक खान्यांत असतात. एक खण निराळा सूक्ष्मदर्शकयंत्रांत पाहावयाचा असल्यास प्रथम एका कांचेच्या भांड्यांत पाणी घेऊन त्यांत पंकेसर हालवावेत, म्हणजे पाण्यामध्ये शेंकडों परागकण मिसळून जातात. नंतर कांच तुकड्यांवर ह्या पाण्याचा एक थेंब घ्यावा व त्यावर बेताने कांच झांकणी ठेवावी. नंतर सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून वेध साधून पाहण्यास सुरुवात करावी. कण वाटोळा असून त्यावर दोन आवरणे दृष्टीस पडतात. बाह्य आवरण खरखरीत व चिंवट असते. अंतर आवरण मऊ असते. त्यामध्ये जीवनकण केंद्रबिंदु दिसतात. परागकण खरोखर एक सजीवपेशी आहे. बाह्य आवरण हे अंतर आवरणापासून उत्पन्न होते. अंतर-आवरण हे पेशीचे सीमादर्शविणारे चिह्न असते. बाह्य आवरण तेलट अगर चिकट असून त्याच आवरणांत परागाचे वेगवेगळे रंग आढळतात. नेहमीचा रंग म्हणजे पांढरा असतो. कधी कधी तांबडा, अस्मानी, पिवळा, वगैरे इतर रंगही आढळतात. बाह्य आवरण साधे असते अथवा कधी कधी त्यापासून किरणासारखे सूक्ष्म भाग चोहोकडे वाढतात. झेंडूचे परागकण सूर्यबिंबाप्रमाणे वाटोळे असून त्यापासून किरणेही चोहोकडे येतात; पण तेच वांग्यांतील परागकण साधे वाटोळे असतात. आवरणांवर रंधेही आढळतात. रंध्रांची संख्या दोन अगर तीन असते. एकदल वनस्पतींत परागकणांवर एकच रंध्र असते; पण द्विदल वनस्पतीमध्ये परागकणांवर तीन रंध्रे असतात. पाण्यांत उगवणान्या फुलांत परागकणांस बाह्य आवरण नसते. - वाटोळे, त्रिकोणारुति, चौफुली, शंखाकारी, चक्राकारी, पट्कोनी, वगैरे शेकडो आकार कणास येतात. शिंगाड्यामध्ये परागकण त्रिपेशी अगर चतुःपेशी आढळतात. तसेच ह्या परागकणांवर कांहीं खांचाही असतात. सोनचाफा, पानकमळ वगैरे फुलांत परागकणांवर एक सांच असते. नाकदवण्यामध्ये परागकणांवर दोन खांचा; गुलाब, बदाम, वांगी, बटाटे वगैरेमध्ये तीन खांचा; तसेंच भोंकर, तुळस वगैरेमध्ये चार खांचा; अशा निरनिराळ्या खांचा निरनिराळ्या फुलांचे परागकणांवर असतात, आवरणाचा खरखरीतपणा, त्यावर येणारे किरणासारखे फांटे, तसेच त्यांची रणे व त्यांवरील ओशटपणा, वगैरे गोष्टी अप्रत्यक्ष रीतीने गर्भधारणेस