पान:वनस्पतीविचार.djvu/202

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

armanwwwraannanormation.anitarian १७४ - वनस्पतिविचार. [प्रकरण Narrrrrrrrrrrrrr नाही. पण अलीकडील शोधांती असें ठरत आहे की, अग्ररंध्रच परागकणाच्या आंत शिरण्याचा रस्ता, असे नसून इतर भागांतूनही परागकण शिरूं शकता. रंध्रातून परागकण शिरला म्हणजे त्यास वरून खाली यावे लागते; पण रंधातून न शिरतां तो बीजाण्डाचे बुडाकडून शिरतो, तेव्हां प्रथम तो खाली येऊन नंतर पुनः वर जातो, एवढाच काय तो फरक. - बहुदलधान्य-वनस्पतींत बीजाण्डांची गर्भधारणा मुख्य बाबतीत वरीलप्रमाणे असते. बहुदलधान्य-वनस्पतींत अण्डाशय पूर्ण झांकलेला नसून बीजाण्डे दलावर उघडी असतात. पुंकेसरापासून परागकण गळं लागले असता, परागवाहिनी नसल्यामुळे ते परागकण पुष्कळ वाया जाण्याचा संभव आहे. बीजाण्डे दलावर उघडी असल्यामुळे त्यावरील रंध्र परागकण पकडण्यास उपयोगी पडते. परागकण वा-याने रंध्रापाशी नेले जातात. रंध्रावर डिंकासारखा एक बिंदु असतो. त्यामुळे परागकण तेथे चिकटून राहतात. जेव्हां तो चिकट बिंदु वाळू लागतो, तेव्हां परागकणही रंध्रामध्ये संकुचित होतात. रंधांत शिरल्यावर परागकणांच्या लांच नळया बनतात. परागकण गळण्याचे दिवसांत हे रंध्र मोठे व रुंद होऊन रंधावर डिंकाचे बिंदु चमकत असतात. पुष्कळ वेळां हे बिंद देवाचे बिंदु असावेत, असा समज होण्याची संभव आहे, पण हे देवाचे बिंदु नसून परागकण पकडण्याकरितां ही नैसर्गिक व्यवस्था असते. ह्या व्यवस्थेशिवाय परागकण सहसा पकडले जाणार नाहीत व पुढील बीजही त्यापासन तयार होणे शक्य नसते. तो चिंदु गळू लागला म्हणजे परागकण रंध्रांत अडकला जाऊन पुनः बाहेर जाईल अशी भीति नसते. परागकण रंध्रांत सांपडला म्हणजे लागलीच गर्भधारणेस सुरवात होते, असें नाहीं. कित्येक वेळां ते परागकण सहा सहा महिने आंत राहू शकतात. तोपावेतों बीजाण्डांतही फरक होत असून आंतील गर्भाण्ड पक्कदशेत येत असते. पक्कदशा आल्यावर गर्भधारणेस उशीर लागत नाही. रंधांत सांपडल्यावर परागकणाचे वेगवेगळे विभाग होतात. पैकी काही विभाग लहान व कांही मोठे असतात. लहान भागांपैकी एक भाग पुंतत्वजननपेशी असतो. मोठ्या भागापासून परागनळी उत्पन्न होऊन त्यांतून जननपेशी जातांना तिचे दोन माग होऊन एकच भाग गर्भधारणक्रिया उरकतो. ज्युनिअरमध्ये ते द्विधा होणारे दान्हा भाग गर्भधारणेस उपयोगी पडतात. एवढेच नव्हे तर जास्त जरूरी असेल तर