पान:वनस्पतीविचार.djvu/218

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ वनस्पतिविचार. [प्रकरण mmarawwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwimmmmmer तयार होतात. ही फळे फुटन बीज बाहेर गळतात. शेंगेचे निमुळतें अग्र हे परागवाहिनीचा अवशिष्ट भाग होय. फळांवर पुष्पकोश कायम राहतो. - बाभूळ, खैर, वगैरे बीजें शेंगेसारखी असून ती फुटत नाहीत. प्रत्येक खणांत एक एक बीज असते. - तृणजातीच्या फळास दाणे म्हणतात. प्रत्येक दाण्यावर फळाची खुण स्पष्ट असते. ह्या फळांत निराळी बीजे दाखवितां येत नाहीत. कणीस म्हणजे फळांचा गुच्छ होय. फुलामध्ये अधिक स्त्रीकेसरदले असून फळांत तें एकच राहते. फळांतील एका बाजूस असणारा गर्भ म्हणजे येथील बीज होय. असल्या फळांत एकच बीजदल असते. ही फळे कधीही फुटत नाहीत. एरंडी वर्गातील फळे नेहमी त्रिदळी असून दलें वेगळी होतात. जिरे, धने, सोपा, वगैरेमध्ये फळे द्विदली असून प्रत्येक दलांत एक बीज असते. येथे पुष्पाधार वाढून त्यास दोन्ही दले चिकटली असतात. मधुमालती, पापडी, वगैरे फळांमध्ये दोन पक्ष असतात; त्यांमुळे ती फळे हवेतून वाऱ्याने सहज इकडे तिकडे जाऊ शकतात. पेरूं, घोसाळी, दोडके, भोपळे, वगैरेमध्ये फळे मांसल होऊन ती. फुटत नाहीत. बीजें पुष्कळ असून ती परिघाकडील बाजूस नाळेशी चिकटली असतात. पेरूंची बीजे मुटी होऊन गीरांत बुडाली असतात. घोसाळ्यात ती मुटी न होता त्यांचा नाळेशी संबंध तसाच कायम असतो. गीराची उत्पत्ति नाळेच्या मांसल पेशीसमुच्चयापासून होते. लिंबूवर्गाची फळे वाटोळी व मांसल असतात. फळाची साल जाड अत: त्यांत सुवास उत्पन्न करणारे तेलोत्पादक पिंड असतात. प्रत्येक फांकेव तंतुमय वेष्टण असून मध्यभागी त्याचे जणू दोरखंड बनते. प्रत्येक फार्केत दोनपासून चारपर्यंत बीज असतात. असली फळे हा वर्ग खेरीज इतरत्र असत नाहीत. मोहरी, शिरस, गोभी, वगैरेमध्ये फळे शेंगेसारखी असून त्यांत एकाऐवज दोन स्त्रीकेसरदले असतात. शिवाय दोन्ही नाळांचा संबंध एकत्र येऊन मध्य भागी पातळ पापुद्रा उत्पन्न होतो. ह्यास बजि चिकटतात. फळे बुडाकडून