________________
२२ वें]. 3. फळ, . wwwwwwwww अग्राकडे फुटत जातात. फळांतील बाह्य पडदे गळून गेले, तथापि बाज मध्यपापछ्यावर तशीच चिकटून राहतात. मुळ्यांच्या डिंगन्या शिरसापेक्षा लहान असून अधिक जाड असतात. त्या इतराप्रमाणे फुटत नाहीत. अफू, धोत्रा, कापूस, केशरी बोंड, वगैरे फळे उच्चस्थ व बहुदली असतात. अशा फळास बोंडे म्हणतात. ही बोंडे फुटन बीजें बाहेर गळतात. असली बोंडे पुष्कळ वनस्पतीमध्ये असतात. - बहुदलवनस्पतींत फळे अग्राकडे निमुळती असतात, त्यामुळे त्यांस कोनारुति येते. चेथे अण्डाशय स्त्रीकेसरदलांनी पूर्ण आच्छादित नसल्यामुळे बीजाण्डे अथवा वीजें उघडी असतात. फळे वाळून ती लांक डांसारखी टणक होतात. प्रत्येक दलावर दोन बीजे असतात. देवदार, सुरू वगेरे उदाहरणे या वगापकी आहेत. स्ट्राबेरी, नास्पाती, सफरचंद वगैरे फळें मौल्यवान समजतात. स्ट्राबेरीमध्ये पुष्पाधार ज्यास्त वाढून वरच्या बाजूस अधिक फुगतो. फुगलेल्या भागांत दाणेदार कण असतात. हे फळ म्हणजे केवळ एक पक अण्डाशय आहे असें नाहीं. तर पुष्पाधार मांसल होऊन त्यावरील वेगवेगळे लहान लहान अण्डाशय मिळन एक पूर्ण फळ बनते. ह्या फळाची रुचि आंबट-गोड असते. उन्हाळ्यांत ह्या फळांचा उपयोग साहेब लोकांद होतो, त्यामुळे त्यास अधिक किंमत येते. हिंदु लोकांत ह्या फळाचा खप फारसा नसतो. नास्पाती अगर सफरचंद ही फळे आडवी कापून पाहिली असतां मध्यभागी कठीण व टणक अण्डाशय दिसतो. येथे पांच खोकेसरदले असून प्रत्येकांत दोन वाजे असतात. बाहेरील मांसल भाग पुष्पाधारापासून उत्पन्न होतो. हा मांसल भाग रुचकर असतो. ही फळे खाण्यास पौष्टिक असतात. आजारी माणसांस ह्या फळापासून फार फायदा होतो. - तुती, फणस, वगैरे फळे साधी नसून त्यांची उत्पत्ति एका फुलापासून न होतां पुष्कळ फुलांच्या समुदायापासून होते. पक्क तुतीचे परीक्षण केले असतां, असे आढळून येईल की, ते फळ पुष्कळ लहान लहान फलांचे बनले आहे, तसेच प्रत्येक फळ वेगळे असते. त्याबद्दलची खुण म्हणजे परागवाहिनींचा अवशिष्ट भाग हा सुद्धा त्यावर पाहण्यास सांपडतो. म्हणजे एका साधारण पुष्पाधारावर पण्कळ छोटी फळे परस्पर चिकटून एक फळ तयार होते,