________________
वनस्पतिविचार. [प्रकरण पिकलेल्या स्ट्राबेरीमध्ये व काळ्या तुतींत बाह्यदृष्टया फरक आढळणार नाही, पण स्ट्राबेरी फलाची उत्पत्ति एका फुलापासून असते व तुतींमध्ये पुष्कळ फुलापातून एक फळ तयार होते. हा फरक पूर्ण लक्ष्यांत असावा. स्ट्राबेरीचे फुलांत स्त्रीकेसरदले सुटी असल्यामुळे फळामध्ये लहान फळासारखे दाणेदार कण दृष्टीस पड़तात; पण तुतींमध्ये असला दाणेदार आकार वेगवेगळ्या फुलांतील अण्डाशयामुळे उत्पन्न होतो. फणसाच्या वाढीची तन्हा फार चमत्कारिक असते. प्रथम फणसाचा मोहोर दोन उपपुष्पपत्रांमध्ये वेष्टिलेला असून, ती उपपुष्पपत्रे गळल्यावर आंतील लबलबीत पुष्पदांडीवर हिरव्या व पांढऱ्या रंगाचे बारीक ठिपके दिसू लागतात. हे ठिपके फणसाची बारीक फुलें होत. गर्भधारणक्रिया पूर्ण झाली म्हणजे, आंतील छोटेखानी फळे वाढू लागतात. ज्याप्रमाणे धोत्रा, एरंडी वगैरे फळांत बाहेरचे अंगास काटेदार सुजवटे येतात, तद्वतच फणसाचें फळ वाढू लागले म्हणजे, ते येऊ लागतात. प्रथम बुडाकडे हे कांटे येऊन नंतर वरवर येत जातात. फणस उभा कापिला असतां आंतील फळांची तसेंच बीजांची मांडणी दिसते. आठळ्यावरील गऱ्याची उत्पत्ती बहुतेक अण्डाशयांतील पेशी समुच्चया. पासून होते, गन्यांचा तसेंच आठळ्यांचा भाजीमध्ये अगर नुसता खाण्यांत उपयोग करितात. ____ अंजीर, उंबर, पिंपरणी वगैरे खरीं फळे नसून भ्रामक (Spurious) आहेत. उंबर कापून पाहिले असतां आतील बाजूवर लहान लहान फळे किंवा फुले दृष्टीस पडतात. ही सर्व फुले एका साधारण पुष्पाधारावर असून जेव्हा फळ पक्क होऊ लागते, त्यावेळेस पुष्पाधार मऊ व मांसल होतो. त्यांतील पशासमुच्चय रुचकर होतो. फळांत पुष्कळ वेळां किडे आढळतात. उंबरें बेसावधपणाने पुष्कळ वेळां खाण्यांत येतात, त्यामुळे ते किडे पोटांत जाऊन एखादा रोग उत्पन्न होण्याची भीति असते. तेव्हां ही फळे खाणान्यांनी ज्या विषयीं सावधगिरी घ्यावी हे उत्तम