पान:वनस्पतीविचार.djvu/222

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ वनस्पतिविचार. [प्रकरण manam नरम, कठीण, खरखरीत, केसाळ व पंखारुति असते. शेवगा, मोहोगनी, विगोनिया वगैरेमध्ये बीजास पंखे असल्यामुळे हवेंतून एकाजागेपासून दुस-या जागी त्यास जाता येते. मांदार व करवीरवर्गातील बाजास लहानसें झुपकेदार केसाळ आवरण असते. ह्या झुपकेदार केसाच्या साहाय्याने बीजें हवेतून इकडून तिकढे उडू शकतात. लहान मुलांच्या खेळांतील म्हातारी पुष्कळांनी पाहिली असेलच. सूर्यकमळ, झिनिया वगैरे बीजांत ह्याच प्रकारचा केसाळ भाग असतो. हे केसाळ पुंजके पुष्पकोशदर्शक चिन्हे आहेत. त्यांचा बीजाण्डाच्या आवरणाशी संबंध नसतो. कापूस, शेवरी वगैरेमध्ये बीजांभोवती पूर्ण केसाक आवरण असते. त्या केसाळ रुईपासून पिंजून सूत काढून उत्तम उत्तम कपडे तयार करितात. कधी कधी गर्भधारणा झाल्यावर जेव्हां बीज वाढू लागते, त्यावेळेस एखादे उप-आवरण छिद्राजवळ वाढते. एरंडीवरील बुडाशी असलेला पांढरा मुजवटा अशाच प्रकारे उत्पन्न होतो. जायपत्रीची उत्पत्ति ह्याच प्रकार असते. जायफळावरील बाह्यावरण जास्त वाढून पुढे ते सुटे व मांसल होते. हे मांसल आवरणच जायपत्री बनते. कमळाच्या जातीमध्ये काही बीजावर अशा प्रकारचे बाह्य आवरण वाढून बीजाभोंवतीं एक पिशवी तयार होते. - बाह्यांगाच्या कमी अधिक टणकपणाप्रमाणे बीजाची जननशक्ति असते. ही जननशक्ति पुष्कळ बीजांत वेगवेगळ्या प्रकारची असते. काही बीजे एक दोन वर्षे राहिली असतां पेरण्यास निरूपयोगी होतात. पण तेच उलट काहा बीजें पन्नास वर्षांची जुनी जरी असली, तथापि त्यांची उगवण्याची चैतन्यशक्ती कमी होत नाही. काही जुनी बीज पेरण्यास अधिक चांगली समजतात, जसें-काकडी, खिरे, वगैरे. तसेंच कांही वनस्पतींत जुनी बीजें निरूपयोगी होतात. जसे-लिंबू, महाळुग वगैरे. येथे एवढे सांगितले म्हणजे बस्स आहे की, बाजामध्ये कवचीवर हवेचा कोणताही परिणाम न होणारा टणकपणा असला तर ती बीजे जास्त दिवस टिकणारी असतात. बीजामध्ये अन्नाचा सांठा असतो. ह्या अन्नाचा उपयोग बीज जननांत होतो. याचा उगम बीजाण्डांत होतो. गर्भकोशांत जें द्वितीयक केंद्र मध्यभागी असते, त्यांशी उरलेले पुतत्व मिलाप पावून तीन केंद्राचे एकीकरण हात. कर