________________
२३ वें.] बीज. १९९ rammmmmmmmmmmmmm आदिमूल अगर प्रथम खोड ह्या दोन्हींपेक्षां बीजदलें नेहमी मोठी व स्पष्ट असतात. बहुतकरून एकदलवनस्पतीत आदिमूल (Radicle ) खोडापेक्षा लहान असून जाड असते. कांद्याच्या बीजांत गर्भ अर्धचंद्रारुति असतो. बहुदलधान्यवनस्पतींत बीजदलें दोन्हीपेक्षा अधिक असतात. जेव्हां गर्भाबाहेर मगजाचें आवरण नसते, त्यावेळेस बीजदले जाड व मांसल होतात. तसेंच जेव्हां ते आवरण असते, त्यावेळेस बीजदले पातळ पानांसारखी असतात. बीजदलें देंठविरहित असून त्यांचे किनारे सारखे असतात. अमरवेलाच्या बीजांत बीजदले नसून येथील गर्भ पातळ सुतासारखा व मळसूत्री असतो. खरोखर अमरवेल उच्चवीपैकी द्विदलधान्य-वनस्पतीमध्ये मोडत असून त्यास बीजदले वाढत नाहीत, हा अपवाद आहे. नाहीतर नियमाप्रमाणे येथे दोन बीजदलें असली पाहिजेत. ___ येथे ही गोष्ट नमूद करणे जरूर आहे की, जर बीजें मगजवेष्टित असतील, तर त्यांतील गर्भ मगजाच्या लहान मोठ्या आवरणाप्रमाणे लहान मोठा असतो. म्हणजे मगजाचे आवरण लहान व पातळ असेल तर गर्भ ज्यास्त मोठा आढळतो. तसेच ते आवरण मोठे असतांना गर्भ संकुचित व लहान असतो. तृणजातीतील बीजांमध्ये बीजाच्या आकारमानाने मगजाचा सांठा मोठा असल्यामुळे त्यांचा गर्भ नेहमी लहान असून एका कोपऱ्यात असतो. पण उलटपक्षी नेटूलमध्ये गर्भ मोठा असून मगजसांठा पातळ असतो. बीजे जमिनीत योग्य परिस्थितीत पेरिलीं असतां उगवून त्यांपासून लहान रोपे तयार होतात; व पुढे त्या रोप्यांवर पुनः बीजें येतात. जमीन, हवा, पाणी व उण्णता इतक्या गोष्टींची बीजजननास आवश्यक जरूरी आहे. पाणी मिळाले असतां बीज फुगन आंतील सजीवतत्त्व जागृत होते. बीजांतील पोषक सत्त्व रूपांतर पावून त्यापासून पूर्वी वर्णन केलेले अंकुर बाहेर पडतात. दिवसेंदिवस तें पे.पक सत्त्व कमी होत जाऊन रोप्याची वाढ चांगली होते. पुढे त्यावर पाने, फांद्या वगैरे येतात. शरीरवाढ पूर्ण झाल्यावर हळुहळू फुलें येऊ लागतात. फुले फुलून परागपतन परागवाहिनीवर होऊन गर्भधारणा पूर्ण होते. त्यापासून फळे तयार झाल्यावर फळांमध्ये बी में पोसतात. ह्याप्रमाणे बीजापासून पुनः बीज तयार होऊन झाडांची परंपरा कायम राहते.